जामखेड | नगर सह्याद्री
रत्नदीपबाबत असलेले विद्यार्थ्यांचे प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. सोमवारी दि. ११ रोजी जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली.
विद्यार्थ्यांची कैफियत ऐकून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळले. रत्नदीप फौंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक, आर्थिक, माणसिक, शाररीक पिळवणूकमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आ. रोहीत पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली.
आ. रोहित पवार यांनी सदर प्रकरणाबाबत वेगवेगळे गुन्हे दाखल करावे तसेच अर्थीक लुट करताना कोरे बाँड घेतले. याबाबत सावकारकीचा गुन्हा दाखल करावा अशा सुचना दिल्या. कर्जत जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सदर संस्थेचे डॉ. भास्कर मोरे याने हरीण पाळले व जखमी अवस्थेत संस्थेच्या आवारात सापडले याबाबत तसे व्हिडिओ, फोटो प्राप्त झाले त्यानुसार गुन्हा दाखल केला असून या गुन्हयात तीन ते सात वर्षे सजा असल्याचे सांगितले.
लोणारे विद्यापीठ एच एस जोशी विशेष कार्यअधिकारी सलग्नीकरण एच एस जोशी, सहाय्यक कुलसचिव सावित्रीबाई फुले विद्यापीठ जयेश कोळी यांनी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नापैकी परिक्षा फॉर्म भरून घेतले जातील व शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी घेतली.