spot_img
ब्रेकिंगआमदार नीलेश लंके बाजी मारणारच! 'यांनी' व्यक्त केला विश्वास

आमदार नीलेश लंके बाजी मारणारच! ‘यांनी’ व्यक्त केला विश्वास

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
ये तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रचारात उडी मारली आहे. नगर दक्षिणची लढाई मी सर्व सामान्य विरूद्ध बलाढ्य व धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी असून लढाईत नीलेश लंके बाजी मारतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मविआचे अधिकृत उमेदवार आमदार नीलेश लंके यांची पाथर्डी तालुक्यात ‘स्वाभिमान जनसंवाद यात्रा’ सुरु आहे. यावेळी भेट घेऊन आमदार रोहित पवार यांनी शुभेच्छा देत अर्धा तास चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवारचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, विकास लवांडे, चांद मणियार उपस्थित होते.

आमदार पवार म्हणाले की, माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून मला जेवढे मताधिक्य मिळाले, तेवढे मताधिक्य मी माझ्या मतदारसंघातून लंके यांना या निवडणुकीत देणार आहे. त्यांच्यासाठी संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघात मी स्वतः सभा घेणार आहे. लंके हे आमचे नेते शरद पवार यांच्या सोबत असल्याने सध्या मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य विरोधात बलाढ्य, अशी जरी ही लढाई असली, तरीही लोकशाहीची ताकद मोठी आहे. योग्य पद्धतीने प्रचार केल्यास लंके हे मोठ्या मताधिक्याने येतील, असेही पवार म्हणाले.

निलेश लंकेना वोट अन नोटही..!
दक्षिण लोकसभा मतदारसंघात आमदार नीलेश लंके यांनी १ एप्रिल पासून मोहटा देवी गडावरून जनसंवाद यात्रा सुरुवात केली असून पाथर्डी येथील मोठा देवी गडावरील बचत गटातील महिलांनी एक लाख २५ रुपये हजार रुपयांचा मदत निधी धनादेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व निलेश लंके यांच्याकडे सुपूर्द केला. तर या मतदारसंघात दौरे करत असतानाही मोठ्या प्रमाणावर मदत निधी स्वयंस्फुर्तीने जमा होत आहे .त्यामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून लंके यांच्याकडे पाहिले जात असून त्यांना या लोकसभा निवडणुकीत वोट आणि नोट दोन्ही मिळत असल्याची चर्चा कार्यक्रम स्थळी होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...