अहमदनगर । नगर सहयाद्री-
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी दंड थोपटले असून यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. आमदार लंके आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत लंके यांना संधी मिळणार नसल्याचे निश्चित झाले असून राजकारणात आज मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके इच्छुक असून, त्यामुळेच त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
आमदार निलेश लंके हे आज दुपारी चार वाजता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.