spot_img
राजकारणआंदोलनाची धार वाढणार! 'या' आमदारांचे 'मंत्रालय' बाहेर उपोषण; आ. लंके दिला लंकेंनी...

आंदोलनाची धार वाढणार! ‘या’ आमदारांचे ‘मंत्रालय’ बाहेर उपोषण; आ. लंके दिला लंकेंनी ‘हा’ इशारा

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री

मराठा आरक्षणा प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके मंगळवारी मुंबई येथील मंत्रालय बाहेर उपोषण सुरू केल्याने या आंदोलनाची धार आणखी वाढली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित असून या आरक्षणासंबंधी भिजत घोंगडे पडले आहे त्यामुळे तातडीने न्यायालयाचा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावे व ज्या शिंदे समितीची स्थापना करण्यात आलेली आहे त्या समितीने तातडीने या आरक्षण संबंधी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावे अशी मागणी सुद्धा आपल्या उपोषण दरम्यान केली आहे.

या अगोदर पण मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत यासंबंधीचे पत्रच आपले सकल मराठा समाजाला दिले आहे. तर दुसरीकडे वेळप्रसंगी विधानसभेचे अधिवेशन सुद्धा बंद पाडण्याचा इशारा आमदार निलेश लंके यांनी दिला होता. आमदार नीलेश लंके मंत्रालय बाहेर उपोषणास बसल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.

सरकारपेक्षा आम्हाला मराठा आरक्षण व समाज महत्त्वाचा

गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित असून त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळाले पाहिजे. आम्ही आज जरी सरकारमध्ये सहभागी असलो तरी मराठा समाज व आरक्षण हे पहिल्यांदा व महत्त्वाचे असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले. त्यामुळे या आरक्षणासाठी मराठा समाजाला आम्ही पाठिंबा जाहीर केला असून आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.

– आमदार नीलेश लंके

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लेकाला पाहून आईने हंबरडा फोडला; ह्रदयद्रावक घटनेनं परिसर हादरला

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- |प्रवरा नदीपात्रात मामा व भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे परीसरात...

आजचे राशी भविष्य! वाचा एका क्लिकवर..

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती...

जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा! दोन अपक्ष बाजी मारणार

महायुती 7, मविआ 3 तर 2 अपक्ष बाजी मारणार! नगर शहरात कमालीची उत्सुकता | श्रीगोंदा,...

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...