spot_img
अहमदनगरAhmednagar News: आमदार 'आरोपी' चे 'बॉस? काही तर बिल्ला लाऊनच फिरतात; भाजप...

Ahmednagar News: आमदार ‘आरोपी’ चे ‘बॉस? काही तर बिल्ला लाऊनच फिरतात; भाजप नेत्याने थेट अजित पवार गटाच्या आमदारावर निशाणा साधला

spot_img

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही गोळीबाराची घटना घडली असून पुन्हा हे प्रकरण तापले आहे. कारण भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यकांवर गंभीर आरोप केले आहेत.

गुरूवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात हा गोळीबार झाला. या गोळीबारात तणवीर हमीफ रंगरेज (वय 36) हा तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान कोपरगाव गोळीबार प्रकरणानंतर भाजप नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहायक जोशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

विवेक कोल्हे नेमकं काय म्हणाले?
कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणात जे आरोपी अटक केले त्या आरोपींनी गोळीबार करण्याआधी आमदारांचे बॉस म्हणून स्टेटस ठेवले होते. आरोपीने आमदारांचे फ्लेक्स लाऊन बॉस म्हणून संबोधित केलं असून आमदार आरोपींना राजाश्रय देतात का? असा आरोप त्यांनी आमदार आशुतोष काळेंवर केला आहे. आरोपी नाझिम शेख आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोपरगाव शहरात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू आहेत. शहरात गुन्हा करणारे लोक आमदारांचा बिल्ला लाऊन शहरात फिरतात. आमदार म्हणाले विरोधकांना गाडून टाका. येणाऱ्या निवडणुकीत जनता आमदारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जखमी व्यक्तीने गोळीबार करणाऱ्यांची माहिती दिली आहे. पोलीस आरोपींवर काय कारवाई करणार? असा सवाल विवेक कोल्हेंनी उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...