spot_img
अहमदनगर'बेपत्ता इसमाची गोदावरी नदीत उडी घेवून आत्महत्या'

‘बेपत्ता इसमाची गोदावरी नदीत उडी घेवून आत्महत्या’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
सोनई येथील बेपत्ता झालेल्या इसमाने प्रवरासंगम येथे गोदावरी नदीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याचे दिसून आले आहे. श्रीकृष्ण उर्फ राजेंद्र लक्ष्मीकांत बिबवे (वय 63) हे शुक्रवार दि. 4 पासून बेपत्ता असल्याची खबर सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. शनिवारी दुपारी प्रवरासंगम गोदावरी नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला.

कुणाल श्रीकृष्ण बिबवे यांनी सोनई पोलीस ठाण्यात खबर दिली की शुक्रवार सायंकाळी घरी गेलो असता वडील घरी न दिसल्याने आईला चौकशी करून वडिलांचे मित्रांना विचारपूस केली.याबाबत कोणालाच माहिती नसल्याने शोध घेतला असता वडिलांनी त्यांच्या मित्राला फोन करून प्रवरासंगमला आलो असून गाडी पुलावर लावली असून गाडी घरी घेऊन जाण्यास सांगितले.

प्रवरासंगम येथे गेलो तेथे मोबाईल फोन व स्कूटी मिळाली, अशी खबर सोनई पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. प्रवरासंगम पुलावर गाडी लावल्याने सकाळपासून नदीत शोध घेतला जात होता. शनिवारी दुपारी गोदावरी नदीत मृतदेह सापडला असून नेवासा येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...