spot_img
ब्रेकिंगमंत्री विखे पाटील यांचा उद्या ’डॉक्टर ऑफ सायन्स’ पुरस्काराने होणार सन्मान

मंत्री विखे पाटील यांचा उद्या ’डॉक्टर ऑफ सायन्स’ पुरस्काराने होणार सन्मान

spot_img

राहता। नगर सहयाद्री:-
केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून ‌‘डॉक्टर ऑफ सायन्स‌’ ही मानाची पदवी देऊन गुरुवारी सन्मानित करण्यात येणार आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या 26 वा पदवीदान समारंभ गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी होत असून, राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन, कृषिराज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघना बोडकर, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. व्ही. के. तिवारी, कृषिशिक्षण व संशोधन परिषदेचे तुषार पवार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मंत्री विखे पाटील यांनी शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. यापूव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंत्री विखे पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित केले होते.

नामदार विखे पाटील यांनी आपल्या राजकीय, सामाजिक वाटचालीत अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम करून, सामाजिक हिताचे निर्णय घेतले. प्राध्यान्याने कृषी व पणन मंत्री असताना शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाली. शेतकरी ते ग्राहक ही योजना पहिल्यांदा राज्यात सुरु करून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला नवी बाजारपेठ मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शेतकरी गट आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना त्यांनी मंत्रिपदाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचा सहकार चळवळीचा वारसा त्यांनी पुढे घेऊन जातानाच सहकारी साखर कारखानदारी, सहकारी बँकिंग क्षेत्र आणि सहकारी पतसंस्था चळवळीलाही पाठबळ देत सहकार क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देतानाच कौशल्य शिक्षणालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे.मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजना तसेच आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षण योजनेची सुरुवात त्यांनी प्रवरेच्या शिक्षण संस्थेतून सुरु केली.

35 प्रकारचे विविध अभ्यासक्रम सुरू करून, ग्रामीण भागातील युवकांना संधी निर्माण करून दिली. अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी स्वतंत्र प्लेसमेंट सुविधा उपलब्ध करून दिल्या. मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करून, विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.विखे पाटील परिवाराचे सामाजिक योगदानही मोठे असून, आरोग्य क्षेत्रामध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, प्रवरा मेडिकल ट्रस्ट या माध्यमातून समाजासाठी आरोग्याच्या सुविधाही त्यांनी निर्माण केल्या. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांची चळवळ सुरू करून, ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी आणि लखपती दिदी योजनेतून अर्थसाहाय्य करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांचा चांगला पुढाकार राहिला आहे. या सन्मानाबद्दल नामदार विखे पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...