spot_img
अहमदनगरमंत्री विखे पाटील यांनी सुप्यात साधला कार्यकर्त्यांशी संवाद! "आता गुंडागर्दी रोखण्यासाठी..."

मंत्री विखे पाटील यांनी सुप्यात साधला कार्यकर्त्यांशी संवाद! “आता गुंडागर्दी रोखण्यासाठी…”

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
ग्रामपंचायत, सोसायटीच्या निवडणूका असल्या की त्यात लक्ष घालायचे लोकांमध्ये दहशत निर्माण करायची दमबाजी करायची हे असले उद्योग तालुयात गेले साडेचार वर्षे सुरू होते. येणार्‍या निवडणुकीत याचे उत्तर तुम्हाला मतपेटीतून द्यायचे असून या त्रासाला जनता कंटाळली म्हणून डॉ. सुजय विखे यांचा विजय निश्चित आहे असा टोला महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता लगावला.

पालकमंत्री विखे पाटील यांनी बुधवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता पारनेर तालुयातील सुपा जिल्हा परिषद गटात सुपा येथील तालुका दूध संघाचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच दत्तात्रय पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

मंत्री विखे म्हणाले की, महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. त्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला असून आज पर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर सुमारे ७० कोटी रुपये जमा झाले आहे. काही दूध उत्पादक शेतकरी तालुयाच्या व जिल्ह्याच्या बाहेर दूध घालतात अशा शेतकर्‍यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले. त्याचे मुख्य कारण म्हणजे कागदपत्रे सादर करण्यात अडचणी येऊ लागल्या.

परंतु त्याही आपण दूर केल्या आहेत. भविष्यात एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही विखे यांनी उपस्थितांना दिली. याचा निर्णय मी स्वतः घेणार असून मला कोणाला विचारायची गरज नाही. यामुळे जिल्ह्यातील दूध भेसळ कमी झाल्याचे आवर्जून सांगत भविष्यात भेसळ बंद करून निर्मळ वातावरण निर्माण करायचे असे सांगितले.

तालुयात हुल्लडबाजांची काही कमी नाही, त्यामुळे सुपा औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योग बाहेर गेले याला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारा खासदार आपणास निवडून द्यायचा आहे असेही ते म्हणाले.

यावेळी भाजपा नेते विश्वनाथ कोरडे, माजी सभापती काशिनाथ दाते, तालुका प्रमुख राहुल पाटील शिंदे, माजी तालुका प्रमुख सुनील थोरात, विक्रमसिंह कळमकर, सागर मैड, रामचंद्र मांडगे, माजी सभापती गणेश शेळके, सरपंच मनिषा रोकडे, योगेश रोकडे, दत्तात्रय पवार, सुनील पवार, सुरेश नेटके, अविनाश पवार, सुखदेव पवार, प्रतापसिंह शिंदे, राहुल पवार यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारनेर तालुका जिल्ह्यात आघाडी घेईल
तालुयात अनेकांना कशा ना कशा प्रकारे त्रास दिला आहे. त्याचा वचपा काढण्याची हीच वेळ आहे. तालुयात डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेहमीच झूकते माप दिले असल्याने पारनेर तालुका जिल्ह्यात आघाडी घेईल.
– राहुल पाटील शिंदे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम ‘या’ दिवशी जाहीर होणार?

माय नगर वेब टीम Zilla Parishad Panchayat Samiti Election : येत्या २ डिसेंबर २०२५...

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...