spot_img
ब्रेकिंगखा.लंके यांची मंत्री डॉ. मांडविया यांच्याकडे मोठी मागणी; 'त्या' कामासाठी ४५ कोटींचा...

खा.लंके यांची मंत्री डॉ. मांडविया यांच्याकडे मोठी मागणी; ‘त्या’ कामासाठी ४५ कोटींचा निधी द्या..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर शहरातील वाडिया पार्क साठी वीस कोटी तर पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड व शेवगांव या तालुक्यांतील क्रीडा संकुलांसाठी प्रत्येकी पाच कोटींच्या निधीची मागणी खा. लंके यांनी केली असून हा निधीही मार्च महिन्यात मंजुर करण्याची ग्वाही केंद्रीय श्रम, रोजगार, युवा कार्यक्रम तथा खेळ मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.

नगर शहरातील वाडिया पार्क तसेच विविध तालुक्यांतील क्रिडा संकुल किंवा त्यात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खा. लंके यांनी नवी दिल्ली येथे खा. भास्कर भगरे यांच्यासह मंत्री मांडविया यांची भेट घेतली. यासंदर्भात लंके यांनी मांडविया यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, नगर शहरातील वाडिया पार्क हे जिल्हयातील एकमेव प्रमुख क्रीडा संकुल आहे.

या संकुलामध्ये अनेक सुविधांची आवश्यकता असून काही सुविधांअभावी विस्तृत आणि मोठे क्षेत्रफळ असूनही या संकुलापासून खेळाडू उपेक्षित राहत आहेत. वाडिया पार्क विकसीत करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास एक गुणवत्तापुर्ण क्रीडा संकुल उभे राहील. त्या माध्यमातून विविध खेळांना प्रोत्साहन मिळू शकेल असा विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला आहे.

नगर शहराबरोबरच पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगांव या तालुक्यांमधील क्रीडा संकुलांमध्येही विविध सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे क्रीडा संकुल असूनही ग्रामीण भागातील खेळाडूंना त्याचा लाभ घेता येत नाही. मंत्री मांडविया यांनी या मागणीचा विचार करून निधी मंजुर करण्याची मागणी खा. लंके यांनी यावेळी केली. खा. लंके यांच्या मागणीचा विचार करून येत्या मार्च महिन्यात 45 कोटींच्या निधीला मंजुरी देण्याची ग्वाही मंत्री मांडविया यांनी दिल्याचे खा. लंके यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...