spot_img
ब्रेकिंगनिवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

spot_img

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अन्य दोन व्यक्तींनी एक महत्त्वाची याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये भुजबळ कुटुंबीयांना 2021 मध्ये दोषमुक्त केल्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांना 9 सप्टेंबर 2021 रोजी दोषमुक्त केले होते. परंतु, त्या निर्णयाला दमानिया, दीपक देशपांडे आणि आमदार सुहास कांदे यांनी तीन स्वतंत्र याचिका दाखल करून आव्हान दिले होते. न्यायालयाने एप्रिलमध्ये या याचिकांवर नोटीसा बजावल्या होत्या, परंतु त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी थंडावली होती. आता या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीमुळे निवडणुकांच्या काळात भुजबळांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...