spot_img
देशमोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ पर्यंत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली सरकारने बंदीबाबत सूचना जारी केल्या आहेत. याशिवाय दिल्लीतील सर्व जनतेकडूनही सहकार्याची विनंती करण्यात आली आहे.

वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने ९ सप्टेंबर रोजी फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर १ जानेवारीपर्यंत बंदी घातली होती. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. गतवर्षीप्रमाणे यंदाही सरकारने दिल्लीत फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत फटाक्यांची ऑनलाइन विक्री आणि वितरणावरही बंदी असेल.

या बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलीस, डीपीसीसी आणि महसूल विभाग यांच्या सहकार्याने कृती आराखडा तयार केला जाईल, असे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले होते. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सरकार २१ फोकस पॉइंट्सवर आधारित हिवाळी कृती आराखडा तयार करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...