spot_img
ब्रेकिंगमहायुतीचा तिढा सुटेना! ११ मार्चला पुन्हा बैठक, कालच्या बैठकीत नेमकं काय घडलं?...

महायुतीचा तिढा सुटेना! ११ मार्चला पुन्हा बैठक, कालच्या बैठकीत नेमकं काय घडलं? पहा..

spot_img

Lok Sabha Election 2024 लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीतील घटक पक्षांत जागावाटपावरून खल सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित बैठक होऊनही जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली वारी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

शुक्रवारी रात्री (ता.८) महायुतीच्या जागावाटपाबाबत अमित शहांच्या दरबारी जवळपास दोन तास खलबंत रंगली. जागावाटपाच्या मुद्द्यावर तुटेपर्यंत न ताणण्याची तयारी भाजपकडून दाखवण्यात आली आहे. मात्र, अजूनही शिंदे आणि पवार गटांना अपेक्षित तेवढ्या जागा देण्यात भाजपने तयारी दर्शवली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने ठरवलेल्या सूत्रानुसारच महायुतीत जागावाटप होईल, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे. विजयाची खात्री, हाच निकष भाजपचा असल्याचं शहा यांनी दोन्ही नेत्यांना सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गटात नाराजीचा सूर आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला एक आकडी म्हणजेच ४ किंवा ५ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. तर शिंदे गटाला ७ ते ८ जागा सोडणार, असं अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कमी जागा दिल्या जात असल्या तरी, विधानसभा निवडणुकीत मात्र अधिक जागा देऊ, असं आश्वासन देखील अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता जागावाटपाबाबत नेमकी अधिकृत घोषणा कधी होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

तिढा सुटेना, ११ मार्चला पुन्हा बैठक
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र, त्यावर सकारात्मक तोडगा निघू शकलेला नाही. जागावाटपावर आता अंतिम तोडगा काढण्यासाठी येत्या सोमवारी (ता. ११ मार्च) महायुतीच्या नेत्यांची शाह यांच्याकडे बैठक होणार आहे. त्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शयता वर्तविण्यात येत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. महायुतीमध्ये तीन ते चार जागांवर एकमत होत नसल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी होणार्‍या बैठकीत या जागांवर एकमत होण्याची शयता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेल, असे सांगण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...

बिबट्या ठार मारा; तरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार, खारे कर्जुने ग्रामस्थांचा गाव बंदचा निर्णय

खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला...