spot_img
ब्रेकिंगMaharashtra Rain : हवामान खात्याचा पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना यलो...

Maharashtra Rain : हवामान खात्याचा पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना यलो अलर्ट

spot_img

Maharashtra Rain : अहमदनगर / नगर सह्याद्री – अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली असून रविवारी जिल्ह्यात सरासरी ३१.२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. शेवगाव, पारनेर, श्रीरामपूर, राहुरी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. अजून तीन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

शनिवार, रविवारी सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. रविवारी दुपारपासूनच हवामानात बदल जाणवत होता. दुपारी जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली. तर रविवारी रात्री जिल्ह्यात काही भागात गारांसह सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस झाला. यात शेतकर्‍यांच्या कांदा, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनावरांच्या चारा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारी नगर-१५, पारनेर ३९.१, श्रीगोंदा ५.८, कर्जत २.९, जामखडे १.२, शेवगाव ४१.३, पाथर्डी २६.३, नेवासा ३५.४, राहुरी ४४.४, संगमनेर ५०.५, अकोले ४६.२, कोपरगाव ४४.३, श्रीरामपूर ४६, राहाता ४२.२ मिलीमिटर पाऊस झाला.

९ मंडलात अतिवृष्टी
रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यात निघोज ८२, भातकुडगाव ६९, सलाबतपूर ६९, कुकाणा ६९, देवळाली ७४.३, आश्वी ७२.३, शिबलपूर ६७, तळेगाव ७०.३, पोहेगाव ६६.५ मिलीमिटर पाऊस झाला.

जिल्हा प्रशासनाचे दक्षता घेण्याचे आवाहन
भारतीय हवामान विभागाने अहमदनगर जिल्हयात २७ नोव्हेंबर २०२३ रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टी होण्याची शयता वर्तविलेली आहे. दि. २८ नोव्हेंबर २०२३ ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शयता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच जायकवाडी धरणासाठी प्रवरा नदीस भंडारदरा धरणातून ९,४०४ युसेक, निळवंडे धरणातून १०,००१ युसेक तर ओझर बंधा-यातुन ९,२४३ युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. मुळा धरणातून मुळा नदीस ६,००० युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीस १२,६२० युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील तमाम नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅटर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत | दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे. वीजा चमकत असतांना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शयता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणा-या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शयतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज, गारपीट आणि पाऊस यापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४ वा २३५६९४० वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पिकअप-रिक्षाचा भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी…

जामखेड / नगर सह्याद्री जामखेड करमाळा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने पाडळी फाट्यावर असलेल्या...

Politics News: नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी भाजपानेच आखला डाव? ठाकरे गटाच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई। नगर सहयाद्री- शिनसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोठा दावा करण्यात आला आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर...

‘सिंघम अगेन’ मधील अजय देवगणचा ‘फर्स्ट लूक’ समोर

नगर सहयाद्री टीम- बॉलीवुड अभिनेता अजय देवगणचं नाव घेतलं की त्याची ‘सिंघम’ व्यक्तिरेखा डोळ्यासमोर आल्याशिवाय...

सुखी संसारात पडलं विरजण! बावीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पण क्षणात होत्याच नव्हतं झालं..

जामखेड । नगर सहयाद्री मोठ्या थाटामाटात विवाह पार पडल्यानंतर नव दाम्पत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत...