spot_img
अहमदनगरMumbai Halla : 26/11 च्या हल्ल्याच्या आठवणी थरारक व वेदनादायी : आ....

Mumbai Halla : 26/11 च्या हल्ल्याच्या आठवणी थरारक व वेदनादायी : आ. संग्राम जगताप

spot_img

Mumbai Halla : मानस महासंघातर्फे 26/11 हल्ल्यातील शहीदांना भावपुर्ण आदरांजली
अहमदनगर / नगर सह्याद्री –
मुंबईतील 26/11 च्या हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत. पोलीस खात्यातील अधिकारी कर्मचारी यांनी देश संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, मुंबई पोलिसांच्या कर्तव्याची दखल संपूर्ण जग घेत असतात, दहशतवाद्यांशी लढताना आपल्या मुंबईतील पोलीस आणि नागरिक मृत्युमुखी पडले. मुंबईवरील 26 / 11 ला झालेला दहशतवादी हल्ला हा मुंबई पोलिसांनी दहशत वाद्यांचा खत्मा करून हाणून पाडला, त्यांची ही कामगिरी देशासाठी अभिमानास्पद आहे अशा शब्दांत आ संग्राम जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबईत झालेल्या 26 / 11 हल्ल्यात आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाचे रक्षण करणारे शहीदांना आणि त्या वेळेस निष्पाप बळी पडलेल्या नागरिकांना मानस महासंघातर्फे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मेणबत्ती पेटवून भावपुर्ण आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते , भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, विशाल बेलपवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा शहर जिल्हा उपाध्यक्ष दिपक लिपाणे, पप्पू पाटील, महर्षी वाल्मिक स्वामी फौंडेशनचे अध्यक्ष प्रविण घावरी, अजिंक्य भिंगारदिवे, मतीन ठाकरे, अखंड बहुजन समाजाचे अध्यक्ष सागर विधाते, फुले ब्रिगेड भिंगार अध्यक्ष संतोष हजारे, अनिकेत चव्हाण, पै सत्यजित ढवण, पै हर्षल शिरसाठे, जितेंद्र बनकर, दै. मराठवाडा केसरीचे प्रशांत पाटोळे, अफराज पठाण, वीरजी चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भिंगार अध्यक्ष संकेत झोडगे, आ. संग्राम जगताप युवा मंचचे अध्यक्ष पै सागर चवडंके, छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नामदे, बंगाल चौक मित्र मंडळचे अध्यक्ष रिंकू चव्हाण, तुषार म्हेत्रे, अल्तमश जाकीर हुसेन बागवान, अक्षय नागापुरे, फरीद सय्यद, ऋषिकेश विधाते, अभिजित साठे, आकाश चोहान, भैय्या पांढरे, बबलू भिंगारदिवे, सृजल विधाते,गौरव विधाते, आकाश रासने, सिंद्धांत विधाते, सागर पारधे, आतिक कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...

पारनेरचा चेतन रेपाळे उत्तर महाराष्ट्र केसरी; धुळ्याच्या ऋतिकला केले चितपट, ‘असा’ टाकला डाव..

पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शिव छत्रपती संकुलचे नाव राज्यस्तरावर पारनेर | नगर सह्याद्री नाशिक जिल्ह्यातील पाथड...

नगर शहरात चाललंय काय?, अल्पवयीन मुलाचा खुनाचा केला प्रयत्न, वाचा, नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात सोमवार दि. २४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या...

राममंदिराच्या शिखरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

अयोध्या | नगर सह्याद्री अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर...