spot_img
ब्रेकिंगएमआयडीतील कंपनीत भीषण स्फोट; 20 कामगार होरपळले, 2 किमीपर्यंत हादरा

एमआयडीतील कंपनीत भीषण स्फोट; 20 कामगार होरपळले, 2 किमीपर्यंत हादरा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री
डोंबिवलीमध्ये एमआयडीसी फेज-2 मधील अमुदान नावाच्या केमीकल कंपनीत गुरुवारी दुपारी मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 20 ते 25 कामगार होरपळून गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, दोन किमीपर्यंतची जमीन हादरली. कंपनीच्या काही किमी अंतरावरील इमारतींच्या काचा फुटल्या. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या देखील काचा फुटल्या.

सर्वसामान्य नागरिकांच्या कानठळ्या बसतील असा हा स्फोट होता. कंपनीत बॉयलरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे एकामागे एक असे तीन स्फोट झाल्याचा आवाज आला. या स्फोटांचा आवाज खूप मोठा होता. स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनी जळून खाक झाल्याचं बघायला मिळत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाच्या 6 बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण कंपनीत अजूनही सातत्याने स्फोट होत असल्यामुळे काळजी वाढली आहे. कंपनीतील बॉयरलमध्ये स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली. ही आग लवकर नियंत्रणात आली नाही तर त्याची झळ आसपासच्या कंपन्यांनाही बसण्याची शक्यता आहे. भयंकर म्हणजे ही कंपनी रहिवाशी भागालगत असल्यामुळे प्रशासनाची काळजी वाढली आहे.

घटना घडलेली कंपनी केमिकलची आहे. बॉयलरमधील केमिकलच्या स्फोटामुळे ही आग लागली. त्यामुळे ही आग सर्वसामान्य आगीसारखी नाही. तिला विझवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या केमिकलचा मारा करावा लागतो. त्यामुळे ही आग विझवण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलापुढे आहे.

या दुर्घटनेत 20 ते 25 कामगार जखमी झालेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे काही महिला व मुले जखमी झालेत. जखमींवर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातत्याने होणाऱ्या स्फोटामुळे आकाशात काळा धूर पसरला आहे. म्हात्रे पाडा, सोनार पाडा या भागांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी एका कंपनीत असाच स्फोट झाला होता. त्यात अनेकांचा बळी गेला होता. या घटनेमुळे त्याची आठवण काढली जात आहे.

“डोंबिवली एमआयडीसीमध्ये अंबर राज म्हणून एक कंपनी आहे, या कंपनीत बॉयलरचा स्फोट झालेला आहे. माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. तिथे सर्व रेस्क्यू टीम पोहोतली आहे. तिथे जिल्हाधिकारी पोहोचत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे पोहोचले आहेत. त्यामुळे तिथे सर्व कंट्रोलमध्ये आहे. सुदैवाने कॅजवलिटी बहुतेक नाहीय. तिथे रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

“डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...