spot_img
अहमदनगरशासनाच्या विविध धोरणांच्या निषेधार्थ जनआंदोलन, पारनेरमध्ये क्रमबद्ध आंदोलने

शासनाच्या विविध धोरणांच्या निषेधार्थ जनआंदोलन, पारनेरमध्ये क्रमबद्ध आंदोलने

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : शासनाच्या विविध धोरणांचा, निर्णयांचा निषेध करण्यासाठी पारनेरमध्ये क्रमबद्ध जनआंदोलन केले जात आहे. जनहितार्थ मागण्यांसाठी लोकशाही व संविधान बचाव अभियानाद्वारे हे आंदोलन सुरु करण्यात आले असल्याची माहिती अभियानाचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र करंदीकर यांनी दिली.

निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणारी ईव्हीएम मशीन ही आधुनिक मनुस्मृती आहे. या मशीनला हद्दपार करणे, बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्यासाठी शिक्षणाचे खासगीकरण करणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध करणे, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची खासगी कंपनीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरतीचा निर्णय, जीवनावश्यक वस्तूंवरील जाचक कर वसुली व त्याने   निर्माण झालेली महागाई रोखण्यासाठी आदी गोष्टींचा विरोध करण्यासाठी व इतर जनहितार्थ मागण्यांसाठी क्रमबद्ध जनआंदोलन सुरु करण्यात आले असल्याचे करंदीकर म्हणाले.

२० फेब्रुवारीस बेमुदत उपोषण सुरु करून आंदोलसणास सुरवात झाली आहे. राजेंद्र करंदीकर हे उपोषणाला बसले आहेत.२१ फेब्रुवारीस हलगीनाद आंदोलन करण्यात आले. २२ फेब्रुवारीस घंटानाद आंदोलन झाले. २३ फेब्रुवारीस संविधानाचा जागरण गोंधळ असणार आहे. पारनेर तहसील कार्यालयासमोर हे आंदोलने सुरु आहेत.

२६ फेब्रुवारीस सकाळी ११ वाजता संविधान सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.रफिक सय्यद, बाळासाहेब पातारे, राजेंद्र करंदीकर, संतोष वाडेकर, बाळासाहेब माळी, सुभाष लोंढे, रविंद्र साळवे, सतीश गोगडे, हसन राजे, अविनाश देशमुख, प्रदीप मोरे, योगेश सोनवणे, सुदाम कोरडे, मनोज सुर्यवंशी, वसंत कसबे, प्रदीप काळे, किरण सोनवणे, भगवान गायकवाड आदींनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...

कापडबाजारातील अतिक्रमण हटवा; अहिल्यानगर हिंदू समाज आक्रमक, दिला ‘हा’ इशारा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - कापड बाजार, घास गल्ली, मोची गल्लीतील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी...

धक्कादायक! नगर शहरात खासगी ट्राफीक शाखा!; पालकमंत्री, आ. जगताप यांच्या नाकावर टिच्चून लाखोंची वसुली!

एसपी साहेब, 'बोरसे' कडून होतोय तुमच्या नावाचा गैरवापर | 'तानवडे'सह अनेक खासगी एजंटांमार्फत बोरेसेची...

Breaking News : महिलांना २१०० रूपये देण्याच्या घोषणेवर न्यायालयाने दिला नकार; सांगितलं कि….

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय राजधानीतील महिलांना दरमहा २,१०० रुपये...