spot_img
अहमदनगर'मार्केटींग फेडरेशन अजित पवार गटाकडे'

‘मार्केटींग फेडरेशन अजित पवार गटाकडे’

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
राज्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणार्‍या महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन या संस्थेच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सहा जिंकल्या. १९ जागांपैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. १३ जागांवर पवार गटाचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीची धुरा बाळासाहेब नहाटा यांच्याकडे सोपविण्यात आली होती आणि नाहाटा यांनी ती यशस्वीपणे पार पाडल्याने ही मोठी संस्था पवार गटाच्या ताब्यात आली.

महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन या संस्थेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जातीने लक्ष घातले होते. १९ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्या होत्या व सात जागेची निवडणूक लागली होती. या सातही जागेची जबाबदारी अजित पवार यांनी बाळासाहेब नहाटा आणि दत्तात्रय पानसरे यांच्यावर दिली होती.

बिनविरोध झालेल्या १२ पैकी सहा जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाने यापूर्वीच बिनविरोध आल्या आहेत.
सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार सहा उमेदवार हे अजित दादा गटाचे आहेत. त्यामुळे मार्केटिंग फेडरेशनला अजितदादा पवार गटाचे बहुमत झाले आहे.

निवडणुकीसाठी राजेंद्र दादा नागवडे यांनी मोलाची साथ देत व आपली यंत्रणा या कामी वापरून दत्तात्रय पानसरे यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्याचबरोबर आदेश नागवडे मित्र परिवार आमच्या सोबत खंबीरपणे निवडणुकीत होता. अनेक कार्यकर्त्यांनी दिलेल्या खंबिर जबाबदार्‍या यशस्वी पार पाडल्या आहेत.

त्यामुळे यश संपादित करता आले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांकडे नागपूर विभागाची जबाबदारी होती त्यात विशाल सकट, नितीन जठार, गणेश भाऊ, महेश पानसरे यांनी मोलाची साथ दिली व राज्याची निवडणूक जिंकता आली हा मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित संचालक दत्तात्रय पानसरे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ( मार्केटिंग फेडरेशन ) या संस्थेच्या निवडणुकी ची जबाबदारी अजित दादा पवार यांनीबाळासाहेब नाहाटा यांच्यावर सोपवली होती. सदर निवडणूक जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयी वाटचाल यशस्वी करून दिली. त्यातूनच दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली.

बाळासाहेब नाहाटा ठरले किंगमेकर
फेडरेशनच्या निवडणुकीमध्ये श्रीगोंदा तालुयाचे उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी पहिल्या पासून आघाडी घेतली आणि ते विजयी घोषीत करण्यात आले. निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यापासून ते निवडणुकीची व्युवहरचना ठरवण्यामध्ये माहीर असलेले बाळासाहेब नाहटा यांनी आपला करिष्मा दाखवून दिला आणि ही महत्वपूर्ण संस्था अजित पवार यांच्या ताब्यात दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...