spot_img
अहमदनगरबांगलादेशातील हिंसाचाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात मोर्चा

बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात मोर्चा

spot_img
आ. अमोल खताळ, आ.सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांची उपस्थिती 
संगमनेर | नगर सह्याद्री
बांगलादेशात काही महिन्यांपासून मोठा हिंसाचार उफळाला असून त्यात कित्तेक हिंदूंना आपले जीव गमवावे लागले आहे. हिंदू मंदिरे पाडली जातं असल्याच्या आणि हिंदू अस्मितेवर हल्ला होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्याच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
बांग्लादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू वर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे. संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आले आहे. सदरील घटनेचा निषेध एकराष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे.
बांग्लादेशमध्ये 4 ते 20 ऑगस्ट दरम्यान 50 जिल्हांमध्ये हिंदूसमाजावर 2000 हून अधिक जातीय हल्ले झाले असल्याच्या बातम्या रोज येत आहेत.मंगळवारी सकाळी नगर पालिके समोरील शास्त्री चौकातून या मोर्च्यास सुरवात झाली. सकल हिंदू समाजाच्या वतीने काढलेल्या या निषेध मोर्चात सर्व पक्षाचे आणि संघटनेचे  लोक सहभागी झाले होते.
शास्त्री चौकातून निघालेल्या या मोर्च्याचा समारोप संगमनेरचे प्राताधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन देऊन झाला. या निवेदनात बांगलादेशातील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य ती भूमिका घेऊन हिंदू हितासाठी योग्य ती पाऊले उचलावी अशा आशयाचे निवेदन प्राताधिकाऱ्यांना देण्यात आले.
या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नागरिक पदाधिकारी तसेच संगमनेरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी झाल्या. संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांच्यासह विविध संघटना, हिंदू समाज बांधव उपस्थित होते.
अहिल्यानगर शहर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात इंपिरीयल चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन भव्य मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा शुभारंभ ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरचे महंत संगमनाथ महाराज यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाजबांधव सहभागी झाले होते.

हिंदूंवरील अत्याचाराचा खा. लंकेंनी नोंदवला निषेध
बांगलादेशमधील हिंदूंवर गेल्या काही दिवसांपासून अत्याचार सुरू असून सनातन धर्माविरूध्दच्या कथित कटाचा भाग म्हणून जाणीवपुर्वक मंदिरे आणि हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचे नमुद करून खा. नीलेश लंके यांनी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला आहे. तसे खा. लंके यांच्यावतीने जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ यांना निवेदन देण्यात आले आहे. बांगलादेशातील हिदू धमयांवर मोठया प्रमाणात अत्याचार सुरू असून काही दिवसांपासून हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. बांगलादेशातील अध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्णदास यांना नुकतीच अटक करून त्यांना तुरूंगात टाकण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत. जगामध्ये कोठेही हिंदू धमय किंवा अल्पसंख्यांक धमयांवर होणारा अत्याचार हा अत्यंत चुकीचा असून मानवता धर्म जोपासण्यासाठी महाराष्ट्र व भारत सरकारने यासाठी तातडीने पावले उचलून बांगलादेशमधील हिंदू धमयांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्व स्तरांवरून होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. हिंदू धर्माने समस्त जगाला मानवतेचा धर्म शिकविला आहे. अत्यंत सहिष्णू असणाऱ्या हिंदू धर्माबाबत बांगलादेशमध्ये मात्र कटटरतावादी धार्मिक द्वेषभावना निर्माण करून तेथील स्थानिक हिंदूंचा छळ करत असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...