spot_img
अहमदनगरMaratha reservation: सरकारचे निमंत्रण, जरांगे यांचा नकार! नेमकं प्रकरण काय?

Maratha reservation: सरकारचे निमंत्रण, जरांगे यांचा नकार! नेमकं प्रकरण काय?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत जवळ येत चाललेली असताना सरकारमध्ये हालचाली वाढल्या आहेत. या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकांमध्ये जरांगे पाटील यांना सरकारने निमंत्रण दिले आहे. मात्र जरांगे पाटील यांनी बैठकीला जाणार नसल्याचे सांगितले आहे.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दिलेल्या मुदतीत सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. अशातच, जरांगे यांच्या इशार्‍यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या वतीने हालचालींना कमालीचा वेग आला आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. बैठकीसाठी मनोज जरांगे यांना देखील उपस्थित राहण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र, आपण या बैठकीला जाणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना मराठा आरक्षणावर चार मॅरेथॉन बैठक होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली.

बैठकांसाठी आले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. मात्र, आम्ही त्यांना सांगितले आहे की, आमचीच विनंती आहे, तुम्ही तुमच्या स्तरावर बैठका घ्या. येण्यासाठी आमच्याकडे वेळ कमी आहे. तुमचा निर्णय आम्हाला कळवा. आम्हाला काय पाहिजे हे त्यांना माहिती आहे. आमचे दोन शब्द मध्ये घ्या, इतकेच आमचे म्हणणे आहे. तुम्ही ते शब्द घ्या, कायदा पारीत करा, आम्ही असलो काय किंवा नसलो काय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...