spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation: डेडलाईन काही तासांवर! बीड मध्ये 'इशारा' सभा, मनोज जरांगे...

Maratha Reservation: डेडलाईन काही तासांवर! बीड मध्ये ‘इशारा’ सभा, मनोज जरांगे यांच्या ‘भूमिकडे’ महाराष्ट्राचे लक्ष?

spot_img

बीड | नगर सह्याद्री-
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि मराठा समाजाच्यावतीने सरकारला दिलेली डेडलाईन काही तासांवर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबर असून, त्यानंतर आरक्षण मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत. दरम्यान त्यापूर्वी आज बीड शहरात मनोज जरांगे यांची इशारा सभा होणार आहे. सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक उपस्थित राहणार असून आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहा वाजता रॅलीला सुरुवात होईल. तीन ते चार किलोमीटरची रॅली साधारणतः दोन वाजता बीड शहरातील पाटील मैदानावर पोहचणार असून जरांगे पाटील हे मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत.

सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम काही तासांवर आला असून मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हेलिकॉप्टरमधून पुष्पृष्टी

आयोजकांनी परवानगी मिळावी जिल्हाधिकारी कार्यालयातअर्ज केला होता. अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आल्यावर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या पुष्पवृष्टीसाठी परवानगी दिलयामुळे सभास्थळी हेलिकॉप्टरमधून मनोज जरांगे यांच्यावर पुष्पृष्टी केली जाणार आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...