मुंबई।नगर सहयाद्री-
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केलं. उपोषण मागे घेताना त्यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून जनतेशी संवाद साधत आहेत. त्यातच अत्ता मराठा आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरक्षणाचा कायदा करण्यासाठी राज्य सरकारकडून २६ फेब्रुवारीपासून मुंबईत अधिवेशन बोलवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितलं होतं.
मनोज जरांगे यांनी मांडली स्पष्ट भूमिका
महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळ मागण्यात आला आहे. दरम्यान २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिल तर पुढं काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, सरकारला मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यांनी दिलेला शब्द पाळून आरक्षण द्यावं, अन्यथा आम्ही आंदोलन पुकारु, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.