spot_img
महाराष्ट्रमराठा समाजाची दिवाळी गोड करणार; 'या' आमदाराचे मनोज जरांगे यांना आश्वासन, वाचा...

मराठा समाजाची दिवाळी गोड करणार; ‘या’ आमदाराचे मनोज जरांगे यांना आश्वासन, वाचा सविस्तर

spot_img

जालना / नगर सह्याद्री –
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सलग नववा दिवस आहे. आता त्यांनी पाणीदेखील त्यागण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. दिवाळीधीच जरांगे पाटलांना गोड बातमी देणार, असे आश्वासन भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.

लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आमदारांनाही आपल्या सरकारला धारेवर धरण्याचा अधिकार आहे. असे असले तरी दिवाळीच्या आधी जरांगे पाटील यांना गोड बातमी देऊ आणि त्यांच्या सोबत आम्ही फराळ खाऊ, असा शब्द नितेश राणे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे शिवबा संघटनेचे आहेत. ते कांग्रेस सोबत होते याची मला माहिती नाही. तुमच्याकडे काही फोटो असतील तर मला माहीत नाही, असे नितेश राणे म्हणाले. मनोज जरांगे यांना स्क्रिप्ट कोण पुरवते हे आम्हाला उघड करावे लागले असा इशारा नितेश राणे यांनी काही दिवसांपुर्वी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राणे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यात क्षमता असल्यामुळे ते अपेक्षा करत आहे

उबाठा शिष्टमंडळ राष्ट्रपती यांना भेटून मराठा आरक्षण संदर्भात केंद्र सरकारला लक्ष घालायला सांगण्याचे आवाहन करणार आहे. तसेच पंतप्रधानांनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलावे, अशी राऊतांची इच्छा असल्याचे राणे म्हणाले. तुम्ही उठसुठ मोदी आणि केंद्र सरकार यांच्याकडे बोट दाखवता. मग राहूल गांधी यांची काय भूमिका काय आहे? त्यांनी साध एक ट्विट तरी केल आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...