जालना / नगरसह्यादी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. उपोषण सोडताना सरकारने २४ तारखेपर्यंत मुदत दिली होती.
आता ही मुदत संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
जरांगे पाटील यांचा काय आहे इशारा?
“आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान करून उपोषण मागे घेत २४ तारखेपर्यंत वेळ दिला. काल त्यांनी शिंदे समितीने अंतिम अहवालही दिला. ज्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितली होती. आता 24 तारखेच्या आत कायदा करा. याच अधिवेशनात चर्चा करुन मराठा आरक्षणासाठी कायदा पारित करावा, या निर्णयासाठी दुसरे विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नाही. अहवाल आला आहे. नोंदीही मिळाल्या आहेत. त्यामुळे दुसरे अधिवेशन बोलावण्यची गरज नाही याच अधिवेशनात कायदा करावा. अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.