spot_img
तंत्रज्ञानविधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

विधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

spot_img

Manoj Jarange Patil News : अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता. कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय…, याचं आम्हाला काही सोयरं सुतकच नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचा विजय झाला. यावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटील फॅक्टर फेल झाल्याची चर्चा होत आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली. पण ठीक आहे, उद्या आमचा आहे, एक महिन्याभर थांबा ,तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाहीत.

आम्ही मैदानात असतो तर मराठ्यांनी एक शिक्का काम केलं असतं. पण आम्ही सांगितलं होत मराठा समाजाला जे करायचं ते करा. मी दोघांचेही अभिनंदन करतो निवडून येणाऱ्याचही आणि पडणाऱ्याचंही… मराठ्यांच्या फॅक्टरला बघूनच यांनी मराठ्यांना तिकीट दिले ना…, असं मनोज जरांगे म्हणालेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी...

स्व. वसंतराव झावरे यांची स्वप्ने पूर्ण करणार; कोण काय म्हणाले पहा…

आ. काशीनाथ दाते | वासुंदे येथे स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या पुण्यस्मरणनिमित्त कार्यक्रम पारनेर...

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

लोणी | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा...

…म्हणुन दोन गटांत राडा; ‘असा’ घडला नको तोच प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत मारहाण झाल्याची घटना शिंगवे नाईक शिवारात बुधवारी...