spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगे यांची प्रकृती आणखीनच खालावली ! डोळे उघडेनात, पोटदुखीचा त्रास वाढला

मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीनच खालावली ! डोळे उघडेनात, पोटदुखीचा त्रास वाढला

spot_img

जालना / नगर सहयाद्री : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. ते अन्न व पाणी देखील घेत नाहीत. दरम्यान त्यांची आज प्रकृती पुन्हा ढासळली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. त्यांनी सलाईनही लावण्यास नकार दिला आहे.

त्यांनी अन्न त्याग सुरू केला आहे. पाणी पिणंही बंद केलं आहे. त्यामुळे जरांगे अशक्त झाले आहेत. त्यांना थकवा जाणवत आहे. त्यांनी पाणी प्यावं म्हणून लोक विनवणी करत आहेत. पण जरांगे पाटील ऐकायला तयार नाहीत. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत पाण्याच्या थेंबालाही हात लावणार नाही असं जरांगे यांनी सांगितलं.

पोटदुखीचा त्रास सुरू
काल जरांगे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली होती. झोपेतच त्यांना सलाईन लावली होती. पण जाग येताच त्यांनी सलाईन काढून टाकली. आजही त्यांना अशक्त वाटत आहे. त्यांचे डोळे उघडत नाहीये. त्यातच पोटदुखीचा त्रासही वाढला आहे. पण जरांगे उपचार घ्यायला तयार नाहीत. पाणी प्यायलाही तयार नाहीत. त्यामुळे समाजबांधवांची चिंता वाढली आहे. सर्वजण त्यांना विनंती करत आहेत. पण जरांगे निपचित पडून आहेत.

गुरूही धावले
नारायणगडचे महंत शिवाजी महाराज हे मनोज जरांगे यांचे गुरू आहेत. त्यांना जरांगे यांच्या प्रकृतीची बातमी कळताच त्यांनी अंतरवली सराटी गाठली. महंत शिवाजी महाराज यांनी जरांगे पाटील यांना पाणी घेण्याची विनंती केली. पण जरांगे हे गुरूचंही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे टेन्शन अधिकच वाढलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...