spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रथमच टीका, म्हणाले...

मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रथमच टीका, म्हणाले…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर व कधी कधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करताना दिसले. आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच टीका केली आहे.

ते म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वासच राहिला नसल्याची टीका केली आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवरील आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. ते म्हणाले की, आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला होता. त्यांचा आम्ही आजवर सन्मान ठेवला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी विश्वासाला पात्र व्हायला हवं होतं तस झालं नसल्याचं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं. पण तेही केलं नाही. तिथेही ते विश्वासाला पात्र ठरले नाहीत. अंतरवालीतील गुन्हे मागे घेऊ म्हटले. तिथेही विश्वासाला पात्र ठरले नाहीत. उलट आमच्याच लोकांना अटक केली. आमच्याच लोकांना नोटीसा देत आहेत, असा हल्लाच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर चढवला.

दरम्यान ट्रॅक्टर मालकांना दिलेल्या नोटिसींबाबत ते म्हणाले की, नोटिसा दिल्याने वातावरण दुषित होत असून लोकांत रोष आहे. लोकांना लोकशाहीच्या मार्गाने मुंबईत येऊ द्या. तुम्ही असं काय करत आहात? तुम्ही कायदा का पायदळी तुडवता. तुम्ही शांततेचं आंदोलन होऊ द्या. ते होणारच आहे. तुम्ही गोळ्या जरी घातल्या ना तरी आम्ही माघार घेणार नाही. आम्ही मागे हटत नाही आता, असं जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मांडओहळ धरणातून उद्या आवर्तन सुटणार ; आ. काशिनाथ दातेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

पारनेर / नगर सह्याद्री - सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ परतीचा मान्सून समाधानकारक न झाल्यामुळे...

परभणीत राहुल गांधींचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले पहा

परभणी / नगर सह्याद्री - सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण तापलंय. सूर्यवंशी यांच्या...

पुणतांब्यात धार्मिक स्थळी तोडफोड; ग्रामस्थ आक्रमक

राहता । नगर सहयाद्री:- राहता तालुक्यातील पुणतांबा गावात अज्ञात समाजकंटकांनी एका धार्मिकस्थळी तोडफोड केल्याची घटना...

Weather Update: हवामान बिघडलं! हिवाळ्यात पावसाळा; हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्यात पाऊस बरसणार असल्याची...