spot_img
ब्रेकिंगमामा, जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवार यांनी कोणाला...

मामा, जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवार यांनी कोणाला दिला इशारा पहा…

spot_img

बारामती / नगर सह्याद्री :

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात काटे की टक्कर होत आहे. या लढतीकडे राज्यांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस. त्यामुळे बारामती मतदारसंघात सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरु आहे. आज शरद पवार यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्यावर हल्लाबोल केला. “अरे मामा जरा जपून. सरळ करायला वेळ लागणार नाही”, असा थेट इशारा शरद पवार यांनी थेट नाव न घेता दिला. यामुळे चर्चान्ना उधाण आले आहे.

देशाची सत्ता भाजपाकडे आहे. भाजपाकडे सत्ता आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे निर्णय घेतले, त्यामुळे समाजातील मोठा वर्ग आज अस्वस्थ आहे. त्यामुळे या संपूर्ण देशाचे राजकारण योग्य ट्रॅकवर कसे आणता येईल, याचा विचार आम्ही करत आहोत. वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांना आम्ही एकत्र आणले आहे. इंडिया आघाडी तयार केली. यानंतर देशातील परिस्थिती बदलायला लागली आहे. आज केरळ, तामिळनाडू, आध्र प्रदेशसह अनेक राज्यात भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसामध्ये भाजपाची सत्ता आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे देशाचा कारभार योग्य पद्धतीने करायचा असेल तर भाजपाचा पराभव केल्याशिवाय पर्याय नाही”, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

“महाराष्ट्रामध्ये काही पक्ष आहेत. आपल्या भागातही काही पक्ष आहेत. त्या पक्षाचे कुठे दमदाटी करणे, कुठे पाणी देणार नाही म्हणणे, कुठे नोकरी देणार नाही म्हणणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. एक प्रकारे लोकांना दमदाटी करून त्यांना हव्या त्या रस्त्याने लोकांना नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे या गोष्टीकडे बारकाईने पाहिले पाहिजे. मी महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरत आहे. या दौऱ्यात मला एक दिसते की, महाराष्ट्राच्या जनतेला बदल हवा आहे. तो बदल भाजपाला सत्तेतून दूर करणे हाच होय”, अशी टीका शरद पवार यांनी केली.

“इंदापूरमधील काही लोकांची आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना सांगण्यात आले की आम्ही तुमच्या शेतातील पाणी बंद करू. शेतीचे पाणी हे कोणाच्या बापाची इस्टेट नाही. मी त्यांना एवढंच सांगतो मामा जरा जपून. सरळ करायला वेळ लागणार नाही. तुझ्यासाठी काय केले नाही. दुकानात मदत पाहिजे, त्यामध्ये मदत केली. लहान कुटुंबातील लोकांना मदत करणे, पाठिंबा देणे याची गरज असते. ती भूमिका मी घेतली. मात्र, आज त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाही. त्यांचे पाय हवेत आहेत. आज मी एवढे सांगतो की, कोणीही सत्तेचा गैरवापर करत दमदाटी करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवणे हे काम मी एक ते दोन दिवसांत करू शकतो. पण आज त्या रस्त्याने जायचे नाही”, असा इशारा शरद पवार यांनी इंदापूरच्या सभेत बोलताना दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar News : शाळेच्या पहिल्याच दिवशी मोठा अनर्थ टळला; अहमदनगरमध्ये कुठे घडला गंभीर प्रकार…

स्लॅबचे प्लॅस्टर कोसळले | ठेकेदारावर तातडीने कारवाईची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री Ahmednagar News...

दुर्दैवी : विजेच्या शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू, कुठे घडली घटना पहा

बेलवंडीतील घटना | ग्रामस्थांनी केला महाविरणाचा निषेध श्रीगोंदा | नगर सह्याद्री बेलवंडी शिवारात पडलेल्या विजेच्या...

पवारांनी मोदींच्या सभांचा स्ट्राईक रेटच काढला ; म्हणाले..

मुंबई: नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 18 सभा आणि एक रोड...

Nagar Arban Bank News : नगर अर्बन बँक घोटाळ्यात मोठी अपडेट; ‘त्या’ अधिकाऱ्याच्या खात्यात मोठे घबाड

अहमदनगर | नगर सह्याद्री Nagar Arban Bank News : येथील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या...