spot_img
ब्रेकिंग...हा शेतकऱ्यावर अन्याय ! परिस्थिती लक्षात घेवून निर्णय घ्या; प्रवरा पाणी हितसंवर्धन...

…हा शेतकऱ्यावर अन्याय ! परिस्थिती लक्षात घेवून निर्णय घ्या; प्रवरा पाणी हितसंवर्धन समितीची ‘ही’ मागणी

spot_img

भंडारदा, प्रवरा पाणी हितसंवर्धन समितीची मागणी

लोणी।नगर सहयाद्री-

मेंढेगिरी समितीचे निकष पुर्ण करण्‍यासाठी गोदावरी, प्रवरा व मुळा धरण समुहातून सोडण्‍यात येणारे पाणी अत्‍यंत कमी असल्‍याने पाण्‍याचा अपव्‍यय होण्‍याची शक्‍यता गृहीत धरुन, तसेच धरणांच्‍या लाभक्षेत्रातील शेतक-यांच्‍या जीवन मरणाचा प्रश्‍न समजुन घेत कायद्याचा साचेबंदपणा न स्विकारता लवचिक धोरण घेवून या वर्षी नगर, नाशिकच्‍या धरणांमधून पाणी सोडण्‍यात येवून नये अशी मागणी भंडारदरा, प्रवरा पाणी हितसंवर्धन समितीच्‍या वतीने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सं.रा.तिरमनवार यांच्याकडे करण्‍यात आली आहे.

यावेळी भंडारदरा-प्रवरा पाणी हितसंर्वधन समितीचे अध्‍यक्ष व प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ.भास्‍करराव खर्डे पाटील यांच्‍या नेतृत्‍वखाली हितसंर्वधन समितिचे सदस्य डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे चेअरमन कैलासराव तांबे, व्‍हा.चेअरमन सतिष ससाणे, प्रवरा बॅकेचे व्‍हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, कारखान्‍याचे संचालक संजय आहेर, सुभाष ताजणे, सुभाष अंत्रे, दुधेश्‍वर पाणी पुरवठा योजनेचे चेअरमन नंदकुमार डेंगळे, ठकाजी थेटे, निमगावजाळीचे उपसरंपच ज्ञानेश्‍वर डेंगळे, सेवानिवृत्‍त अभियंता प्रकाश खर्डे उपिस्थत होते.

निवेदनात समितीच्‍या वतीने सांगण्‍यात आले आहे की, उर्ध्‍व धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. केवळ मागील पाणीसाठा शिल्‍लक राहील्‍यामुळेच धरणं पुर्ण क्षमतेने भरली. धरणाच्‍या लाभक्षेत्रातही सरासरी पेक्षा कमी झालेला पाऊस विखुरलेल्‍या स्‍वरुपात व समप्रमाणात झालेला नाही. भुजलपातळी खाली गेलेली आहे. कृषि व्‍यवस्‍था व पशुधनाच्‍या संदर्भातील प्रश्‍न अधिकच बिकट होण्‍याची वेळ आली आहे.

केवळ कायद्याची अंमलबजावणी करण्‍याच्‍या हेतूने व दबावाने पाणी सोडण्‍याचा निर्णय घेण्‍यापेक्षा उपलब्‍ध पाणी साठ्याचा कार्यक्षम वापर करुन, एक टिएमसी पाण्‍यात उध्‍वभागात किती सिंचन केले जाते व जायकवाडी धरणात एक टिएमसी पाण्‍यात किती क्षेत्र सिंचित होते याबाबतही तुलनात्‍मक विचार करण्‍याची गरज आहे. अनियंत्रित उपसा व कालव्‍यांधून होणारी गळती यामुळे वाया जाणा-या पाण्‍याकडेही लक्ष देण्‍याची आवश्‍यकता आहे.

घाटमाथ्‍यावरील पाऊस पुर्णपणे थांबलेला आहे. त्‍यामुळे आता वरच्‍या धरणात पाण्‍याची आवक होण्‍याची कोणतीही शक्‍यता नाही. त्‍यामुळे उर्ध्‍वभागात तिव्र टंचाईच्‍या काळात पाणी उपलब्‍ध होणार नाही. याउलट जायकवाडी धरणात २६ टिएमसी मृत पाणीसाठा उपलब्‍ध असल्‍याने यासाठ्यातून पाणी उपलब्‍ध होवू शकते, यापुर्वीही असा वापर केलेला आहे. न्‍यायालयाच्‍या निर्देशाप्रमाणे कोणत्‍याही अटी व शर्थीचे पालन न करता केवळ पाणी सोडले जात असल्‍यामुळे नगर, नाशिकच्‍या शेतक-यांवर एकप्रकारे अन्‍यायच होत आहे. त्‍यामुळे समन्‍यायी पाणी वाटपाचा आग्रह धरणे म्‍हणजे पाण्‍याच्‍या उधळपट्टीला एकप्रकारे प्रोत्‍साहन देण्‍यासारखी असल्‍याची बाबही या समितीने गांभिर्यपुर्वक निवेदनातून स्‍पष्‍ट केले आहे.

न्‍यायालयाने जायकवाडी धरणाच्‍या लाभक्षेत्राचे सिमांकन करुन, कालव्‍यांची गळती थांबविणे, फुगवट्यावरील अवैध उपसा नियंत्रित करणे व धरणातील गाळाची माहीती घेवून पुन्हा पाणीसाठ्याची क्षमता निश्‍चित करणे. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पुर्वेकडे वळविण्‍याबाबत कालमर्यादेत कार्यवाही करण्‍याबाबत सुचित केले गेले असतानाही याबाबतची कार्यवाही गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून होत नसल्‍याची बाबही समितीने या निवेदनातून विशेषत्‍वाने आधोरेखित केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार लंके यांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरुच

खा. लंकेंचा आंदोलनस्थळी मुक्काम । डॉक्टरांकडून उपोषणकर्त्यांची तपासणी अहमदनगर । नगर सह्याद्री नगर जिल्हा पोलीस प्रशासनातील...

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मोठे यश; 84930 शेतकर्‍यांना मिळणार इतका पीक विमा

संगमनेर । नगर सह्याद्री माजी कृषीमंत्री तथा काँग्रेस विधिंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या...

कोण म्हणतं महाराष्ट्राला काही नाही? फडणवीसांनी यादीच वाचली

नागपूर । नगर सह्याद्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला...

Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! सगळा घोळच घोळ; मोदी सरकारने दिले चौकशीचे आदेश

पुणे / नगर सह्याद्री Pooja Khedkar Case: खासगी कारवर लाल दिवा लावल्याने वादात सापडलेल्या...