spot_img
अहमदनगरखासदार विखे पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठी विकासकामे: भाजप नेते कोरडे

खासदार विखे पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात मोठी विकासकामे: भाजप नेते कोरडे

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात खासदार विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठी विकासकामे झाली असून लोकसभा निवडणुकीत खासदार विखे पाटील हे विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याची ग्वाही भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे.

खासदार विखे पाटील यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील वडगाव गुंड येथे शेड देण्यात आले याचा भुमिपुजन समारंभ भाजप नेते विश्वनाथ कोरडे, माजी सभापती काशिनाथ दाते, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ. अजित लंके, ग्रामपंचायत सदस्य रुपाली गायखे, युवा नेते गणेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

कोरडे म्हणाले, गेली पाच वर्षात राज्य सरकार व केंद्र सरकार माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. गेली दोन वर्षात राज्यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत त्याचा फायदा नगर जिल्ह्याला सर्वाधिक मिळाला आहे. पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी होणार असून मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी मोठ्या प्रमाणात योजनांचा लाभ मिळवून दिला असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून मोदी सरकार लोकसभा निवडणुकीत चारशे पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

युवा नेते गणेश लंके यांनी सांगितले की, निघोज-अळकुटी जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन वराळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून सचिन पाटील वराळ यांचे नेतृत्व विकासाभिमुख नेतृत्व असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी भिवाजी गुंड, पांडुरंग पतसंस्थेचे व्हा.चेअरमन दत्तात्रय गुंड, सामाजिक कार्यकर्ते दत्ता घोगरे, भागुजी गुंड, गणेश लंके, रेवजी लंके, अरुण जगदाळे, मेजर भास्कर जगदाळे, विजय गुंड, किसनराव घोगरे, विलास लंके, दिपक लंके, दत्ताभाऊ लंके, अंकुश घोगरे, मोहन लंके, शिवाजी गुंड, प्रशांत लंके, भाऊसाहेब लंके, विशाल जगदाळे, माऊली लंके, गोविंद लंके,विश्वनाथ जगदाळे, शरद लंके, राजेंद्र जगदाळे, विठ्ठल लंके, सुभाष सोनवणे, सुधीर भुकन, सुनिल घोगरे, बाळासाहेब चौधरी, रवी लंके, स्वप्नील लंके, पांडुरंग गुंड, प्रसाद तांबे, बंटी लंके, सिधू सोनवणे आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवेंद्रजी, नगरमध्ये शेकडो वाल्मिकअण्णा!; बीडचा आका डांबला; नगरमधल्या आकांचे काय?

शहरात कोणत्याही क्षणी उद्रेक होणार | सर्वाधिक आका एकट्या नगर अन् पारनेरमध्ये! सारिपाट / शिवाजी...

हेच का महापालिकेचे फ्लेसमुक्त धोरण?; किरण काळे यांनी साधला निशाणा, म्हणाले…

पुतळा व नाट्यगृहाचे काम तात्काळ पूर्ण करा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नुकतेच मनपा आयुक्त यशवंत डांगे...

मूर्तिकारांचा प्रश्न संसदेत मांडणार ः खा. नीलेश लंके

अहिल्यानगर | नगर सह्याद्री संसदेत प्रश्न मांडून केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करून मूर्तिकारांचा प्रश्न मार्गी...

पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी हटवा; आमदार जगताप म्हणाले…

विधानसभेत आवाज उठवा | गणेश मूर्तिकार संघटनेचे आ. जगताप यांना साकडे अहिल्यानगर | नगर सह्याद्री पीओपी...