plane crashed: अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे विमान रहिवासी भागात कोसळले असून, सध्या बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त विमानात एकूण 242 प्रवासी होते. त्यामध्ये 169 भारतीय, 11 लहान मुलं, दोन नवजात बालकं, 53 ब्रिटीश, एक कॅनेडियन, 217 प्रौढ आणि सात पोर्तुगीज प्रवासी होते. तसेच 10 क्रू मेंबर्स देखील होते. या विमानाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवास करीत होते. दरम्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.
अहमदाबाद येथील प्रवासी विमान अपघातानंतर एअर इंडियाने 18005691444 हा आपत्कालीन फोन क्रमांक जारी केला आहे. मेघानीजवळ कोसळलेल्या एअर इंडियाचं प्रवासी विमान टेकऑफच्या 10 मिनिटांत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री पटेल यांनी दिले आहे. एअर ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. हे विमान लंडनला जातं होतं आणि टेकऑफच्या वेळीच हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अपघातवेळी विमानात 242 प्रवासी होते. जखमींना बाजूलाच असणाऱ्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी तातडीने दाखल करण्यात आलं आहे.
माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी अपघातग्रस्त विमानाने प्रवास करीत देखील होते असे उघडकीस आले आहे. अपघातात काही प्रवासी भाजले गेल्याचंही समजत आहे. जखमींना बाजूलीच सरकारी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं आहे. परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले आहे. दरम्यान, विमान दुर्घटनेच्या आधी विमानाच्या पायलटने एटीसीला धोक्याचा संदेश देखील पाठविला होता. कॅप्टन सुमित सबरवाल यांना तीन हजारांहून अधिक तास विमान चालविण्याचा अनुभव होता. त्यामुळे टेकऑफनंतर त्यांच्याकडून चूक होण्याची शक्यता कमी असल्याचं एटीसीने म्हंटलं आहे. या संपूर्ण घटनेनंतर आता गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ही घटनास्थळी दाखल झालेले आहेत. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदशच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला.

कोसळलेल्या विमानाची किंमत किती?
बोईंग 787-8 ड्रीमलायनर ही खूप महागडी आणि अत्याधुनिक श्रेणीतील विमानप्रकार आहे. एका विमानाची अंदाजे किंमत 248 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच जवळपास 2,069 कोटी रुपये आहे. एअर इंडियाने हे विमान ११ वर्षांपूर्वी खरेदी केले होते आणि ते तेव्हापासून कार्यरत होते. अपघातानंतर तपासाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. तसेच बोईंग कंपनीचे प्रतिनिधी हे सुद्धा या प्रकरणाचा तपास करतील. ब्लॅक बॉक्स आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर सापडल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.
विमान मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं; अनेक भावी डॉक्टरांचा मृत्यू
प्रवासी विमान कोसळल्याची दुर्घटना दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर असलेली मेस नेमकी याच वेळेस भरलेली होती. सुमारे ५०-६० डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी ताटावर जेवत असतानाच विमान थेट इमारतीवर आदळलं. या अपघातात काही डॉक्टर्सचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, काहींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.