spot_img
अहमदनगरAhmednagar: मंत्री विखे यांच्या उपस्थितीत रविवारी महायुतीचा मेळावा

Ahmednagar: मंत्री विखे यांच्या उपस्थितीत रविवारी महायुतीचा मेळावा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
नगरमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच शिवसेना (शिंदेगट) राष्ट्रवादी, रासप आदी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. महायुतीतील पक्षांचा प्रथमच एकत्र मेळावा होत असल्याने या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

१४ जानेवारी सकाळी ११ वाजता शहरातील बंधन लॉन्स कार्यालयात हा महाविजय २०२४ हा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी-माजी आमदार त्याप्रमाणे पक्षाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे सर्व आजी-माजी आमदार, तसेच महापालिकेचे माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सह शिवसेनेचे (शिंदे) जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकार्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अशा प्रकारे महायुतीच्या सर्व छोट्या मोठ्या घटक पक्षांच्या जिल्हास्तरीय एकत्रित मेळावा होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कानठळ्या बसविणारे सायलेन्सर पोलिसांनी चालविला रोडरोलर, नेमकं काय केले पहा

पोलिसांनी १३० मॉडिफाइड सायलेन्सरवर चालविला रोडरोलर अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प...

लोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंडाची टोळी 12 तासांत जेरबंद

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा केवळ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय; ठरलेल्या वेळेतच धुरळा उडणार, पण… , कोर्ट काय म्हणाले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील...

नगरमध्ये बिबट्या जेरबंद; बोल्हेगाव परिसरात डरकाळी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर शहराजवळील तपोवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला बिबट्या...