spot_img
अहमदनगरमहायुतीला वेध लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे? नगरमधून 'यांच्या' नावांची जोरदार चर्चा

महायुतीला वेध लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे? नगरमधून ‘यांच्या’ नावांची जोरदार चर्चा

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर विधानसभेला सामोरे जाण्यापूर्वी राज्यात महायुतीला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेत. याबाबत तिन्ही पक्ष आग्रही आहेत. यासाठी भाजपकडून केंद्रीय पातळीवर बैठकांचे सत्र सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नावांची चर्चा मंत्रिपदासाठी सुरू असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे गेलेल्या राज्यातील भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावी तशी छाप मतदारांवर पाडता आली नसल्याचे निकालात स्पष्ट झाले. हाच पॅटर्न विधानसभेत कायम राहिल्यास त्याचा सर्वाधिक फटका भाजपला बसणार आहे. भाजपने आता ओबीसी कार्ड खेळायचे ठरवलंय. त्यासाठी लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन करण्यात येऊ शकते. यासह आमदार संजय कुटे, आमदार पंकज भोयर यांचीही नावं चर्चेत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील सोशल इंजिनिअरींगमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहायचं.

राज्यातील मविआ आणि महायुती आता विधानसभेसाठी सरसावलेत. लोकसभेला केलेल्या चुकांचे मंथन करण्यात आलंय. सत्तेतील महायुतीला आणि विशेषतः भाजपला सत्ता कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करुन आमदारांना मंत्रिपदाची संजीवनी देण्याचा प्रयत्न महायुती करतेय. आता अवघ्या काही महिन्यांसाठी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि त्यातून कोणाचं हित साध्य होणार हे विधानसभेला कळेल.

मंत्रिपदांसाठी या नावांची आहे चर्चा
भाजप
नितेश राणे – कणकवली
माधुरी मिसाळ – पर्वती,पुणे
मनीषा चौधरी – दहिसर
राणाजगजित सिंह पाटील – उस्मानाबाद
देवयानी फरांदे – नाशिक दक्षिण
आशिष शेलार – वांद्रे पश्चिम

राष्ट्रवादी (अजित पवार गट )
संग्राम जगताप – नगर
इंद्रनील नाईक – पुसद
अण्णा बनसोडे – पिंपरी

शिंदे गटातील उत्सुक आमदार?
आशिष जैस्वाल – रामटेक
संजय शिरसाट – छ.संभाजीनगर पश्चिम
भरत गोगावले – महाड
यामिनी जाधव – भायखळा
लता सोनवणे – चोपडा

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...