spot_img
ब्रेकिंगLok Sabha Election: महायुतीच ठरलं! ३० मिनिटांत तिढा सुटला; अजित पवार गटाला...

Lok Sabha Election: महायुतीच ठरलं! ३० मिनिटांत तिढा सुटला; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समजली आहे. महायुतीत ३२ जागा भाजपा, शिवसेना ११ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५ जागा मिळण्याची शयता आहे.

शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघाला आहे. त्यानुसार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकूण १६ जागा दिल्या जातील. त्यातील ११ जागा शिवसेनेला तर ५ जागा राष्ट्रवादीला असा फॉर्म्युला निश्चित केलेला आहे. रायगड, परभणी, बारामती, शिरुर आणि आणखी एक जागा अजित पवारांना सोडण्यास भाजपाने तयारी दाखवली आहे. काही जागांवर शिंदे-अजित पवारांचे उमेदवार कमळ चिन्हावरही निवडणूक लढवतील.

मंगळवारी रात्री सह्याद्री गेस्टहाऊसवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊन शाह यांनी जागावाटपाबाबत चर्चा केली. या बैठकीत सर्वकाही अंतिम करण्यात आले. सुरुवातीला शाह यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली. ही बैठक जवळपास अर्धा तास चालली, त्यानंतर हे दोन्ही नेते सह्याद्री गेस्ट हाऊसवरून निघाले. या दोघांनंतर शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत बैठक घेतली. सूत्रांनुसार, ही बैठक ४५ मिनिटे चालली. त्यात बहुतांश जागांवर एकमत झाले.

शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार कमळ चिन्हावर लढणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला केवळ जिंकण्याची क्षमता असणार्‍या आधारे जागा मिळतील. काही जागांची अदलाबदली केली जाईल तर काही जागांवर गरज भासल्यास कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते असं बैठकीत ठरवण्यात आले असल्याची माहिती समजली आहे.

शिवसेनेच्या जागेंमध्ये होऊ शकते वाढ
आज सकाळी (दि.६) पुन्हा सह्याद्री अतिथीगृहावर जागा वाटपाबाबत अमित शाह यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. भाजपा शिवसेनेला १३ जागा द्यायला तयार होईल असे या चर्चेवरून दिसते. एकनाथ शिंदे यांनी १८ जागांची मागणी आहे. शिंदे गटाला हव्या असणार्‍या उर्वरित पाच जागांचा निर्णय सर्वेनुसार होऊ शकतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...