spot_img
अहमदनगरमहात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली: खासदार विखे पाटील

महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली: खासदार विखे पाटील

spot_img

राहुरी | नगर सह्याद्री
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली. त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्याचा महाराष्ट्राला कधीच विसर पडणार नाही अशा शब्दांत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला.

राहुरी शहरात प्रचार सभेच्यादौरान महात्मा फुले यांच्या जयंती निमित्य अभिवादन करताना ते बोलत होते.
विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदार संघात दौरे सुरू आहेत. लोकांच्या गाठी भेटी घेत जिल्ह्याच्या विकासाठी आपले काय व्हिजन आहे हे सांगत आहेत. अशाच प्रकारे राहुरी शहरात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासह माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

सुजय विखे म्हणाले की, त्या काळात शिक्षणाच्या प्रसार आणि प्रचारासाठी महात्मा फुलेंनी मोठे कष्ट घेत तळागळातील समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले. त्यासाठी त्यांना आद्य महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी साथ अनेमोल होती असे सांगत त्यांनी सावित्री बाई यांच्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला. डॉ. सुजय विखे पाटलांनी लोकसभा निवडुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या सभांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विकास कामाच्या मुद्द्यावर सुजय विखे आपला प्रचार करत आहेत.

नगर जिल्ह्यात त्यांच्या कारर्किदीत झालेली कामे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात केलेल्या कामांचा ते उहापोह करत आहेत. केवळ विकास हा आपला अजेंडा असून, येणार्‍या काळातही जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून, जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या माध्यमातून रोजगार, आणि उद्योगधंद्यांना चालना देण्याचा त्यांचा मानस आहे.प्रचारात कोणत्याही नकारात्मक भूमिका न घेता त्यांनी आपला प्रचार चालवला असल्याने लोकांमध्ये सुद्धा त्यांची प्रतिमा उंचावत आहे. यामुळे निवडणुकीच्या निकलात सुजय विखे हे आघाडीवर असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...