spot_img
ब्रेकिंग"महाराष्ट्रीयन जोडप्यांनी जपली चेन्नईतही गणेश स्थापनेची परंपरा"

“महाराष्ट्रीयन जोडप्यांनी जपली चेन्नईतही गणेश स्थापनेची परंपरा”

spot_img
भाळवणी। नगर सहयाद्री 
आपल्या महाराष्ट्रीयन पुरुष- महिला नोकरी व्यवसायानिमित्त देशात, परदेशात स्थिरस्थावर झालेले असताना आपले पारंपारिक सण, उत्सव, संस्कृती मोठ्या प्रमाणात जपताना आपण पाहतो. असाच एक उत्साहाचा सण म्हणजे गणेशोत्सव. 
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रीयन जोडप्यांनी चेन्नई येथे पारंपारिक पद्धतीने हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. गोरेगाव (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील इंजि. संदीप पानमंद व  सुजाता संदीप पानमंद (कपाळे) यांनी महाराष्ट्रीयन जोडप्यांसह तेथील स्थानिक रहिवास्यांबरोबर मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी तसेच इतरही महिलांनी गणेशाची पुजा करून आपली भारतीय संस्कृती जपली आहे. त्याचबरोबर रक्षिता, जिनिशा, रिजूल, शाम्भवी, अयांशी आदी बालगोपाळांनीही या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा”, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश; जबाबदारी कोणावर पहा…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. भटक्या...

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...