spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्र हादरला! शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला जिवंत जाळलं

महाराष्ट्र हादरला! शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याला जिवंत जाळलं

spot_img

नाशिक । नगर सहयाद्री:-
शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एका गावात घडली. कचेश्वर नागरे (वय ८०) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मयताच्या कुटुंबीयांनी केली असून जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरे कुटुंबियांनी घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी: शेतातील वडिलोपार्जित विहिरीवरुन नागरे बंधूंमध्ये वाद आहे. कचेश्वर नागरे हे मंगळवारी शेतातील घराजवळ साफसफाई करत असताना त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नगरे आणि भावजई आणि पुतण्यांनी कचेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कचेश्वर नागरे स्वतःला वाचण्यासाठी सैरभैर पळू लागले.

त्यांचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय धावत बाहेर आले. तोपर्यंत आरोपी चांगदेव नागरे आणि त्याचे कुटुंब घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, कचेश्वर नागरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ९५ टक्के भाजल्याने कचेश्वर नागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...