spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा; एकही कुणबी नोंद रद्द केल्यास....

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा; एकही कुणबी नोंद रद्द केल्यास….

spot_img

Manoj Jarange Patil News:एकही कुणबी नोंद रद्द केली, तर २८८ उमेदवार पाडले म्हणून समजा. छगन भुजबळांचे ऐकून काम करू नका. मराठ्यांची लेकरे अधिकारी झालेले तुम्हाला पाहवत नाही का? असा खडा सवाल उपस्थित करीत मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे लातुर येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित हजारोंच्या जनसमुदायासमोर जरांगे पाटील म्हणाले, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, त्यातून कोणी राहिलेच तर त्यांनाही आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांना अर्थात मागेल त्यास प्रमाणपत्र द्यावे. सरकारने तसे आश्वासन दिले आहे. इथून पुढे मराठा लेकरांच्या विरोधात जो कोणी नेता जाईल, त्यांचा निवडणुकीत करेट कार्यक्रम केला जाईल, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

दरम्यान यावेळी मनोज जरांगे यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला. यावेळी धनंजय मुंडेंना उद्देशून बोलताना जरांगे म्हणाले की, तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर मराठे कसे तुम्हाला सोडतील, तुम्ही मराठ्यांना त्रास दिला तर मी मराठ्यांच्या बाजूने उभा राहीन. तुम्ही जातीयवाद मोडून टाकण्यासाठी उभे राहा, मराठे तुम्हाला कधीही उचलून धरतील, मराठ्यांच्या बाजूने उभे राहा आणि तुम्ही वाईट वागाल तर मराठे तुम्हला सत्तेपासून दूर करतील. धनंजय मुंडे यांनी स्टेटमेंट केलं आहे, बीडच्या रॅलीला परवानगी नाकारली नाही.. त्यांचं कौतुकच पण मराठ्यांच्या गोरगरीबांना बीडमध्ये त्रास देऊ नका. असेच काम करा. मराठ्यांचे कार्यक्रम उधळून लावू नका, मराठ्यांच्या लोकांना मारू नका, आमच्या लोकांना शिवीगाळ करू नका, असेही जरांगे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

बीडची रॅली शांततेत होणारच
बीडच्या पालकमंत्र्यांनी बीडला रॅली होणार नाही, असा घाट घातला. सभेला परवानगी मिळू दिली नाही. हा जातीयवाद नाही का? २० वर्षापासून भुजबळ यांनी जातीयवाद वाढविला. आज मराठे एकत्र आले, तर जातीयवाद कसा काय वाटतो. गावागावात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. मराठा आंदोलनाला सर्व समाजाचा पाठिंबा आहे, असेही जरांगे-पाटील म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाबद्दल ओबीसी नेते कधीही सकारात्मक होणार नाहीत,ओबीसी नेते विरोधात आहेत, त्यात दुमत नाही. आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे, १३ तारखेपर्यंत सरकार सगेसोयर्‍याची अंमलबजावणी करेल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...