spot_img
राजकारणMaharashtra Politics : सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट, माझ्याकडे पर्याय..

Maharashtra Politics : सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट, माझ्याकडे पर्याय..

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री
Maharashtra Political News : राजकारणाची सुरवात मी शरद पवारांची मुलगी म्हणून केली. माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. मी जर तिकडे गेले असते तर लाल दिवा घेऊन आले असते. परंतु माझ्या आवडिलांचा संघर्ष मी लहानपणापासून बघत आले आहे. माझ्या वडिलांनी संघर्ष केला त्यांना सोडून सत्तेत जाणे मला पटले नाही, असा गौप्यस्फोट खा. सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे.

खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जोपर्यंत सुषमा स्वराज, अरुण जेटली होते तोपर्यंत भाजप होता. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा फक्त शरद पवारांनी चालवला आहे. समाजात महागाई व्हॅली आहे. या सगळ्यांना कारण अदृश्य शक्ती जबाबदार आहे अशी टीका सुळे यांनी केली.

आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आज ना खाऊंगा, ना खाने दुंगाचे काय झाले? आरोप सिद्ध करा नाहीतर आमची हात जोडून माफी मागा. समरजित घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले त्याचे काय झाले? सकाळी 6 वाजता ईडी सीबीआयचे छापे मारले.

नवाब मलिक, संजय राऊत, छगन भुजबळ, अनिल देशमुख यांनी काय केले. सुप्रिया सुळे यांची खरी ताकद त्यांची इमानदारी आहे. दिल्लीच्या अदृश्य शक्तीला नाही चित केलं तर नाव सुप्रिया सुळे सांगणार नाही, असे आव्हान सुळे यांनी दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....