spot_img
महाराष्ट्रLPG सिलेंडर महागला; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ!

LPG सिलेंडर महागला; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ!

spot_img

LPG Cylinder Price: डिसेंबर महिन्यातही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा कल कायम राहिलाय. एक डिसेंबरपासून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग पाचव्या महिन्यात वाढ केली आहे. चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति गॅस सिलेंडर सरासरी १८ रुपयांनी वाढली आहे. मुंबईमध्ये १६.५० रुपयांनी गॅस महागलाय. आता एक डिंसेबरपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील जाणून घेऊया

दरम्यान, मार्च २०२४ पासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत अखेरीस १०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. पण मागील पाच महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत आज 1 डिसेंबरपासून 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1818.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात 16.50 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत आजपासून गॅस सिलिंडर १७७१ रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात त्याची किंमत १९८०.५० रुपये झाली आहे.

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. मुंबईमध्ये १९ किलो वजनाचा व्यवसायिक गॅस सिलेंडर १७५४ रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता १७७१ रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीमध्ये १८१८.५०, कोलकात्यामध्ये १९८०.५० रुपयांना सिलिंडर मिळेल. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ नाही –
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मार्च २०२५ मध्ये घरगुती गॅसच्या किंमतीत बदल झाला होता, त्यावेळी गॅसच्या किंमती १०० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. दिल्लीमध्ये ८०३, कोलकात्यात ८२९, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळतोय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट, कारण आले समोर…

मुंबई / नगर सह्याद्री - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट...

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल धक्कादायक माहिती समोर, ‘त्या’ घटनेस…

न्यायालयीन चौकशीचा अहवाल समोर मुंबई / नगर सह्याद्री - बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार...

महायुतीत बिनसलं! एकनाथ शिंदे, अजित पवार आता भाजपचे नेते नाराज; काय आहे नेमकं कारण?

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत महायुतीत सर्व...

‘शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार', असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे...