spot_img
ब्रेकिंगपॅन कार्ड हरवलंय? घरबसल्या 'असा' करा अर्जे

पॅन कार्ड हरवलंय? घरबसल्या ‘असा’ करा अर्जे

spot_img

नगर सह्याद्री टीम-

प्राप्तिकर विभागाने जारी केलेले पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. त्यात कार्डधारकाचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, स्वाक्षरी आणि पॅनकार्ड क्रमांक असतो. पॅन कार्ड क्रमांक हा एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे जो कार्डधारकाच्या आर्थिक क्रियाकलापांचा मागोवा घेण्यासाठी वापरला जातो.

बँका, विमा कंपन्या आणि इतर व्यावसायिक संस्था यासारख्या व्यक्ती आणि संस्था पॅन क्रमांकाचा वापर करून आयटी विभागाच्या वेबसाइटवर आपल्या आर्थिक अनुपालनाची पडताळणी करू शकतात. त्यामुळे पॅनकार्ड असणे गरजेचे आहे. तुमचे पॅनकार्ड हरवल्यास तु्म्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या अप्लाय करु शकता.

पॅन कार्ड मिळवण्यासाठी कसा भराल अर्जे?

सर्वप्रथम, तुम्हाला TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर वापर करावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला सर्व आवश्यक तपशील भरावे लागतील ज्यात नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर यांचा समावेश असेल.

नंतर तुम्ही दिलेल्या क्रमांकावर एक ओटीपी दिला जाईल. यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स पेजवर विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. यामध्ये प्रत्यक्षरित्या अर्ज दस्तऐवज फॉरवर्ड करणे, ई-केवायसी आणि ई-साइनद्वारे डिजिटली सबमिट करणे या सगळ्या प्रक्रिया असतील.

असा जाणून घ्या तुमचा पॅन कार्ड क्रमांक?

आपण आयटी विभागाच्या वेबसाइटवर आपल्या पॅन कार्डची मौलिकता तपासू शकता. आपल्याला फक्त योग्य माहितीची आवश्यकता आहे. त्यासाठी आयटी विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या

पॅन कार्डधारक आता आपले नाव आणि जन्मतारीख वापरून त्यांचे पॅन कार्ड तपशील शोधू शकतात. पॅन नंबर, नाव आणि जन्मतारीख टाकून तुम्ही तुमच्या पॅन कार्डच्या तपशीलांची सत्यता पडताळून पाहू शकता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...