अहमदनगर। नगर सहयाद्री:-
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने मोठी कारवाई केली आहे. नगर तालुक्यातील वारुळवाडी मध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या गॅस रिफिलिंगच्या उद्योगावर छापा टाकत साडेसहा लाखांचा मुद्देमालासह जप्त मुद्देमालासह ३ आरोपीना जेरबंद केले आहे. ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे सोहेल जाकीर शेख (वय २९), विक्रमसिंह राजबहाद्दुर चव्हाण (वय ३५), आणि प्रल्हादसिंह पप्पुसिंह चव्हाण (वय २०) अशी आहेत.
दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी वारुळवाडी, ता. नगर येथील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठा करून, गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती निक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना मिळाली होती . त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस पथकास, स्थळाची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने त्वरित कारवाई करून, २-३ इसमांना गॅस रिफिलिंग करताना पकडले. सोहेल शेखने गॅस रिफिलिंगचा व्यवसाय स्वतःचा असल्याचे सांगितले. आरोपीकडून ८० रिकाम्या गॅस टाक्या, ३१ भरलेल्या टाक्या, व्यवसायिक १११ रिकाम्या टाक्या, वजन काटे, मशिन, मोटर असा ६ लाख ६५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
आरोपींनी कोणत्याही परवान्याशिवाय अवैध गॅस साठा व रिफिलिंग करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याने, त्यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/तुषार धाकराव, पोहेकॉ/गणेश भिंगारदे, पोकॉ/आकाश काळे, रोहित येमुल, भाऊसाहेब काळे व उध्दव टेकाळे याच्या पथकांने केली आहे.