spot_img
देशभाजपचं ठरलं? गांधीनगरमधून गृहमंत्री शहा तर पंतप्रधान 'मोदी' 'या' मतदार संघातून लढणार

भाजपचं ठरलं? गांधीनगरमधून गृहमंत्री शहा तर पंतप्रधान ‘मोदी’ ‘या’ मतदार संघातून लढणार

spot_img

2024 Lok Sabha Elections: आगमी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सूत्राच्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करू शकते. राजनाथ सिंह यांच्यासह सुमारे १५५ जणांची नावे समाविष्ट असल्याची चर्चा आहे.

सूत्राच्या माहितीनुसार, २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी १५५ उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे. गुरुवारी दि २९ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह यांच्याशिवाय भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींना वाराणसीतून, अमित शहा यांना गांधीनगरमधून, राजनाथ सिंह यांना लखनऊमधून, उमेदवारी मिळु शकते. याशिवाय १५५ जणांमध्ये भिवानी बल्लभगडचे भूपेंद्र यादव, दिब्रुगढचे सर्बानंद सोनोवाल, राजौरी- अनंतनागचे रवींद्र रैना, कोटा येथील ओम बिर्ला, ईशान्य दिल्लीचे मनोज तिवारी, पश्चिम दिल्लीचे परवेश वर्मा आणि असनसोलमधून भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंह यांचा समावेश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

सातारा / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या...

ट्रस्ट जमीन प्रकरणी जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा आहेत मागण्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त...

क्षुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला; नगरमध्ये धक्कादायक प्रकार

भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला...