spot_img
ब्रेकिंगAhmednagar News: नगर जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ! दोन तरुणांवर भल्या पहाटे हल्ला?

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ! दोन तरुणांवर भल्या पहाटे हल्ला?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे पशुधन बळी जात आहे. आता बिबट्याने माणसांनाही लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. अशीच एक घटना २० सप्टेंबर रोजी, शुक्रवारी भल्या सकाळीच अकोला तालुक्याती वीरगावात घडली आहे.

बिबिट्याने दोन तरुणांव हल्ला केला असून ते गंभीर जखमी झाले असून, दोघेजण हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. सदर घटनेचा वनविभागानं तात्काळ पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केल्याचं वन विभागानं सांगितलं आहे. तसेच, सकाळपासूनच अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून आहेत.

अधिक माहिती अशी: सध्या वीरगाव शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस आणि मका पीक आहे. यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत आहे. त्यातच भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचा संचार असल्याने बिबट्यांचे रात्री आणि दिवसाही दर्शन होत आहे.दरम्यान, नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांची सकाळी पिकाला पाणी देणे आणि डेअरीला दूध घालण्याची लगबग सुरू असताना वीरगावमध्ये बिबट्याने हल्ला केला आहे.

बछडे चुकल्याने मादीने हल्ला केला असल्याचे समजते. यामध्ये पहिल्यांदा बस्तीराम रामचंद्र गांगड यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन जखमी केले. त्यानंतर माधव पोपट देशमुख यांच्यावर हल्ला करुन जखमी केले. यातील जखमी गांगड यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविले आहे तर देशमुख यांच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या दोन हल्ल्यानंतर संदीप लक्ष्मण वाकचौरे आणि सार्थक संदीप वाकचौरे हे शेतात दुचाकीवरुन जात असताना त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला, परंतु ते दोघेही बालंबाल बचावले. या घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ वन विभागाला दिली. त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धिंदळे, वन परिमंडळ अधिकारी पंकज देवरे यांसह अधिकारी व कर्मचारी पिंजरे घेऊन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर वन्यजीव बचाव पथकालाही पाचारण केल्यानंतर बाळासाहेब कडलग यांच्या गिन्नी गवताच्या शेतात दडून बसलेल्या बछड्याला शोध मोहीम राबवून पिंजऱ्यात जेरबंद केले. तर मादीला पकडण्यासाठी तीन ठिकाणी पिंजरे लावले असून वन विभाग तळ ठोकून आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...