मुंबई। नगर सहयाद्री
खा. सुप्रिया सुळे यांची पात्रता असती, तर आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते, अशा शब्दात अजित पवार गटाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उत्तर दिले आहे.
‘मला लोक सांगायचे सुप्रिया सुळे तिसर्यांदा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण, पात्रता असताना देखील स्वत:च्या मुलीला बाजुला ठेवून कार्यकर्त्यांना संधी दिली’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते.
यावरून अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या पाठीशी ५४ पैकी ४३ आमदार आहेत.
सुप्रिया सुळे यांची पात्रता असती, तर ४३ आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते. सिंह कन्या राशीत अनेक वर्षापासून झुकलेला होता. सिंह कार्यकर्त्यांच्या राशीतून कन्या राशीत गेल्याने हा गृहदोष निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे.