spot_img
अहमदनगरपुढारी प्रचारात व्यस्त! जामखेड तालुक्यातील शेतकरी समस्यांनी त्रस्त…

पुढारी प्रचारात व्यस्त! जामखेड तालुक्यातील शेतकरी समस्यांनी त्रस्त…

spot_img

जामखेड। नगर सहयाद्री-
जामखेड तालुक्यातीत खर्डा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असणाऱ्या जामखेड तालुक्यातील खर्डा भागात ज्वारी काढणीला शेवटच्या टप्प्यात आली आहे. सध्या ज्वारी काढण्याची लगबग सुरू आहे मजुरांची टंचाई आणि वाढते महागाई शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

खर्डा व परिसरातील प्रमुख पीक असलेले रब्बीतील ज्वारी. वाढती मजुरी व महागाई त्यातच बाजारात शेती मालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी द्विधा मनस्थिती निर्माण झाले असून नुकताचं लोकसभेचे वारे वाहू लागल्याने पुढारी प्रचारात व्यस्त असलेचे चित्र दिसून येते.

रब्बी हंगामात ५० ते ६० टक्के पेरणी झाली. उशिरा पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी करून ज्वारी जगवली. त्यातच मध्यंतरी अवकाळी पावसाने, रोगाचा प्रादुर्भाव, रानडुकरांचा त्रास, विजेचा लपंडाव, शेतकऱ्यांची डोकेदुखी; अवकाळी पाऊस अशा साऱ्या संकटामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले.

त्यातच प्रत्येक संकटावर मात करत शेतकऱ्यांनी पीक जगवले. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे .यंदा मजूरी चांगलेच वाढले. ज्वारी काढणी, पेरणी ,मोडणे, खुरपणी,नांगरणी,मशागत,वाहतूक, औषध फवारणी आदी विविध खर्च करून एकरी अडीच ते तीन हजार खर्च येऊन बाजारात मात्र दोन हजार पासून ३७ शे पर्यंत ज्वारी जाते.

त्यामुळे क्विंटल मागे शेतकऱ्यांना तुटपुंजी उत्पन्न मिळते. सध्या मजूर महिला ४०० ते ५०० तर पुरुष ५००ते ६०० आसपास रोजंदारी वर कामे करत आहे.त्यात खर्डा परिसर मजुरांचा तुटवडा असल्यामुळे काढणीसाठी मराठवाड्यातील मजूर आणून ज्वारी काढणी काम चालू असल्याने शेतकऱ्यांना मराठवाड्यातून मजूर आणल्यास गाडी भाडे मजुरांची वाहतूक ही वेगळी आगावू रक्कम मोजावी लागते.

त्यातच शेतकरी जूट ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतो. जूट ज्वारीला कडबा व ज्वारी पौष्टिक असल्याने चांगला बाजार भाव मिळतो, ही ज्वारी खाण्यासाठी पौष्टिक आहे त्यातच ज्वारीचा कडबा चांगला दर्जा असतो. ज्वारी व कडबा चांगली मागणी असल्याने शेतकरी घेतात .यातच काही शेतकरी माळ दांडी, बेदरी आदी विविध जातीचे पेरणी करतात.

सध्या बागायती, नदी, नाले,ओढे जवळील ज्वारी काळी पडते, रोगराई पडते त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीस व मोडणीस ही परवडत नाही.ज्वारी काळी पडून कडबा ही काळा पडतो .सध्या मजूर ४०० ते ५०० रुपये कडबा बांधणी सह वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागतो. विक्री पेक्षा ग्राहकांना ५००ते ७०० रुपये ज्यादा दराने ज्वारी खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...