जास्त पैसे घेत ९२ लाखांची फसवणूक
अहमदनगर। नगर सहयाद्री
एक एकर जमिनीचे साठेखत रद्द करण्यासाठी बाजार भावापेक्षा जबरदस्तीने जास्त पैसे घेत ९२ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांचन प्रकाश बडेरा (वय ६२ रा. कराचीवालानगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.मदनबाई जयंतीलाल बागरेचा, तिचा पती जयंतीलाल पनालाल बागरेचा व मुलगा भरत जयंतीलाल बागरेचा (तिघे रा. नवी पेठ, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भिंगार हद्दीत सर्व्हे नंबर १०, ११ व १२ मधील ३० एकर दोन गुंठे क्षेत्र असून त्यात सहा जण भागीदार आहेत. त्यातील तीन एकर ३० गुंठे फिर्यादीच्या वाट्याचे आहे. त्यापैकी त्यांनी एक एकर क्षेत्र मदनबाई जयंतीलाल बागरेचा यांना वैयक्तिक व्यवहारापोटी ११ लाखाला ११ ऑगस्ट २०१० रोजी साठे खत करून दिले होते.
दरम्यान त्यानंतर या जमिनी बाबत कोर्ट केसेस व इतर तक्रारी चालू असल्याने मूळ खरेदीदार सहा जणांनी एका विचाराने जमीन विक्री करण्याचे ठरविले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी मदनबाई बागरेचा यांना एक एकर जमिनीचे साठे खत रद्द करण्यास विचारणा केली. मदनबाई, त्यांचा पती व मुलगा यांनी फिर्यादी यांच्याकडून एक एकर जमिनीच्या बाजार भावाने १८ लाख रूपये घेण्याऐवजी जबरदस्तीने, दमदाटी करून ३० ऑगस्ट २०२१ रोजी जमिनीचे जास्तीचे ९२ लाख ६० हजार रूपये घेत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी यासंदर्भात तक्रार अर्ज केला होता. सोमवारी (दि. १२ फेब्रुवारी २०२४) गुन्हा दाखल झाला आहे.
बिले थकले, कचरा संकलन बंदचा इशारा
सुमारे पाच कोटी रुपयांची बिले थकल्यामुळे शहरातील कचरा संकलन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. सोमवारपासून घंटागाड्यांची संख्या कमी करण्यात आली असून, मंगळवारी अवघ्या २५ गाड्यांद्वारे कचरा संकलन करण्यात आले. दरम्यान, आयुक्त पंकज जावळे यांनी ठेकेदार संस्थेशी चर्चा करून कचरा संकलन नियमित सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
कचरा संकलन करणार्या ठेकेदार संस्थेची गेल्या पाच महिन्यांपासून बिले थकली आहेत. जुन्या गाड्यांच्या दुरुस्तीचीही बिले थकीत आहेत. शासनाकडून वित्त आयोगाचे अनुदान न मिळाल्याने ही बिले थकीत आहेत. मनपाची कर वसुली ठप्प असल्याने मनपा निधीतूनही बिले अदा करण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. दुसरीकडे आर्थिक अडचणीत आल्याने ठेकेदार संस्थेकडील कर्मचार्यांचे पगारही थकले आहेत. कचरा संकलन करण्यासाठी वाहनांचे डिझेल, सीएनजीचा खर्चही करणे अवघड झाल्याचे सांगत ठेकेदाराने १४ फेब्रुवारीनंतर काम बंद करण्याचे पत्र दिले आहेत. दरम्यान, आयुक्त पंकज जावळे यांनी ठेकेदार संस्थेशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत काही रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, बुधवारपर्यंत बिले न मिळाल्यास काम सुरू ठेवणे शय नसल्याचे ठेकेदार संस्थेचे सागर शिंदे यांनी सांगितले.
विवाहितेचा छळ;गुन्हा दाखल
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या नऊ जणांविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडगाव उपनगरातील विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती दत्तात्रय रूपचंद क्षीरसागर, सासरे रूपचंद धोंडीबा क्षीरसागर, सासू सुमनबाई रूपचंद क्षीरसागर, जाऊ विद्या अशोक क्षीरसागर, दीर अशोक रूपचंद क्षीरसागर, भाची सारीका, चुलत दीर माऊली क्षीरसागर (सर्व रा. घुमरी पिंपरी, ता. आष्टी, जि. बीड), नणंद लक्ष्मी मारूती डाडर व मारूती डाडर (दोघे रा. मुगगाव ता. आष्टी, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जास्त पैसे घेत ९२ लाखांची फसवणूक
एक एकर जमिनीचे साठेखत रद्द करण्यासाठी बाजार भावापेक्षा जबरदस्तीने जास्त पैसे घेत ९२ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांचन प्रकाश बडेरा (वय ६२ रा. कराचीवालानगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.मदनबाई जयंतीलाल बागरेचा, तिचा पती जयंतीलाल पनालाल बागरेचा व मुलगा भरत जयंतीलाल बागरेचा (तिघे रा. नवी पेठ, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भिंगार हद्दीत सर्व्हे नंबर १०, ११ व १२ मधील ३० एकर दोन गुंठे क्षेत्र असून त्यात सहा जण भागीदार आहेत. त्यातील तीन एकर ३० गुंठे फिर्यादीच्या वाट्याचे आहे. त्यापैकी त्यांनी एक एकर क्षेत्र मदनबाई जयंतीलाल बागरेचा यांना वैयक्तिक व्यवहारापोटी ११ लाखाला ११ ऑगस्ट २०१० रोजी साठे खत करून दिले होते.दरम्यान त्यानंतर या जमिनी बाबत कोर्ट केसेस व इतर तक्रारी चालू असल्याने मूळ खरेदीदार सहा जणांनी एका विचाराने जमीन विक्री करण्याचे ठरविले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी मदनबाई बागरेचा यांना एक एकर जमिनीचे साठे खत रद्द करण्यास विचारणा केली. मदनबाई, त्यांचा पती व मुलगा यांनी फिर्यादी यांच्याकडून एक एकर जमिनीच्या बाजार भावाने १८ लाख रूपये घेण्याऐवजी जबरदस्तीने, दमदाटी करून ३० ऑगस्ट २०२१ रोजी जमिनीचे जास्तीचे ९२ लाख ६० हजार रूपये घेत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांनी यासंदर्भात तक्रार अर्ज केला होता. सोमवारी (दि. १२ फेब्रुवारी २०२४) गुन्हा दाखल झाला आहे.
रात्रीच्यावेळी हत्यारेघेऊन फिरणारे जेरबंद
कोयता, लोखंडी गज आणि विना नंबरच्या दुचाकीवरून रात्री फिरणार्या सहा जणांना तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडले. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून कोयता, लोखंडी गज, दोन दुचाकी जप्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सतीष भवर, बाळासाहेब भापसे यांचे पथक सोमवारी (दि. १२) रात्री हद्दीत गस्त घालत होते. या पथकाला माहिती मिळाली की, बोल्हेगाव उपनगरातील मोरया पार्कजवळ तीन इसम दुचाकीवर फिरत असून त्यांच्याकडे कोयता आहे. पोलिसांनी तेथे जाऊन तिघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे चेतन संतोष सरोदे (वय १८ रा. गांधीनगर), सागर राम कोकणे (वय १९) व यश रावसाहेब क्षिरसागर (वय १८ दोघे रा. भिंगारदिवे मळा) अशी सांगितली. त्यांच्या दुचाकीच्या डिकीत धारदार कोयता आढळला. तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील दुचाकी, कोयता जप्त करण्यात आले.
गुन्हे शोध पथक तपोवन रस्त्यावर गस्त घालत असताना बारा एकर परिसरात दुचाकीवर तीन संशयित इसम मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे अविनाश काळु डुकरे (वय १९), सागर बाळू पवार (वय २२) व रोहित विजय फुलारी (वय २३ तिघे रा. गजराजनगर) असे सांगितले. त्यांच्या ताब्यातील विना नंबरच्या दुचाकीचे कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. तसेच त्यांच्याकडे एक लोखंडी गज आढळला. तिघांना ताब्यात घेत दुचाकी, गज जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल केला.