spot_img
अहमदनगरशहीद जवान संदीप गायकर यांना अखेरचा सलाम; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान संदीप गायकर यांना अखेरचा सलाम; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

spot_img

अकोला । नगर सहयाद्री
काश्मीरमध्ये शहिद झालेले अहिल्यानगरचे जवान संदीप गायकर यांच्यावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात संदीप शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि. २४ रोजी ब्राह्मणवाडा येथेअंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान संदीप गायकर यांच्या अंत्य दर्शनासाठी जनसागर लोटला होता.

गुरुवार, २२ मे २०२५ रोजी पहाटे जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड सेक्टरमधील सिंगपोरा-छत्रू परिसरात मराठा बटालियनच्या १७ आरआर बटालियनने दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम राबवली. या चकमकीत संदीप गायकर यांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले. संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते. सैन्यात त्यांनी आपल्या निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि धैर्यानं सेवा बजावली. देशाच्या सुरक्षेसाठी उभ्या असताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला.

ब्राम्हणवाडा गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदीप यांनी शिक्षण घेतले त्याच विद्यालयाच्या मैदानावर त्यांचा अंत्यविधी झाला. भारत माता की जय… शहीद जवान संदिप गायकर अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. राष्ट्रध्वज स्वीकारताना संदीप यांच्या पत्नी दिपा यांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. अहिल्यानगर पोलिस दल आणि लष्कराकडून संदीप गायकर यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी कुटुंबियांच्या अश्रुचा बांध फुटला होता. संदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा आणि दोन बहि‍णी आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...

एकनाथ शिंदे अधिवेशन सोडून अचानक दिल्लीला रवाना; कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे मुख्य नेते तथा...

श्रीगोंद्यात मंदिरांची विटंबना! दारु पिऊन उच्छाद, समाजकंटकांची हातात कोयते, गज घेऊन दहशत..

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील काष्टी गावातील काही समाजकंटकांकडून मद्यपान करून ग्रामदेवतांच्या मंदिरांची विटंबना होत...