मुंबई। नगर सहयाद्री
अहमदनगरमधील पारनेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून वाऱ्यासारखी पसरली आहे. निलेश लंके यांच्या निर्णयानंतर अजित पवार गटाकडून त्यांना परत यावं अशी साद घालण्यात येत आहे. लंके साहेब, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जातेय, दादांची साथ सोडू नका असं ट्विट करत आमदार अमोल मिटकरी यांनी आवाहन केलंय.
सध्या आ. निलेश लंके हे खासदारकी लढवण्यास इच्छुक आहेत, पक्ष फुटीच्यावेळी लंके अजितदादांसोबत गेले. तर नगरची जागा भाजपच्या वाट्याला आहे. येथे बदल होण्याची शक्यता धूसर असल्याने लंके पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे. लंकेंनी घेतलेला हा निर्णय अजित पवार गटाला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळे भावनिक आवाहन करत अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे.
नेमकं ट्विटमध्ये काय?
लंके साहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय. दादांची साथ सोडू नका. तुम्हाला इतरांपेक्षा उज्वल राजकीय भविष्य आहे . तुतारी गटाला लोकसभा लढवायची एवढीच हौस असेल तर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला मैदानात उतरवून बघा म्हणावं. तुम्ही एक सामान्य आहात म्हणुन विनंती.