अहमदनगर । नगर सहयाद्री-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याभर आंदोलने सुरू आहेत. अनेक ठीकाणी जाळपोळ तसेच तोडफोडीच्या घटना समोर येत असल्यानेखबरदारी म्हणून एसटी महामंडळाने नगर जिल्ह्यातील महामंडळाने एसटीला ब्रेक लावला आहे. आज जिल्ह्यातून धावणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना हाल होणार असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सर्वसामान्यांच्या प्रवासाचं साधन म्हणून एसटी बसकडे पाहिलं जातं. दररोज हजारोच्या संख्येने प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आल्याने प्रवाशांची लगबग सुरु झाली आहे. मात्र, मराठा आंदोलनामुळे लालपरीला ब्रेक लागले आहे.
मराठवाडा व बीड शहरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने फेर्या करण्यात अडचणी येत आहेत. सोमवारी केवळ बीड जिल्ह्यात जाणार्या फेर्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. मंगळवारी ही लांब पाल्याच्या फेर्या रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ ग्रामीण भागातील काही फेर्या सुरू होत्या. आंदोलनाचा अंदाज घेऊन आगारप्रमुख बस सोडण्याचा निर्णय घेत आहे.
लालपूरीला ब्रेक लागल्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही बस अभावी हाल होत आहे. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आल्याने खरेदीसाठी ग्रामीण भागातून शहरात येणार्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे खासगी वाहनदारांकडून प्रवाशांची लूट होत आहे.