श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील गुंडेगाव येथील रुक्सना अशीर सय्यदची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली. घरची जेमतेम स्थिती, वडिलांचा खेड्यात कुल्फीच्या व्यवसाय, अशा प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करत रुक्सनापोलीस दलात दाखल झाली.
दिड वर्षापुव तिचा इनामगाव येथील पिरजादे कुटुंबात विवाह झाला. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या रुक्सनाला पती आणि सासू-सासऱ्याऱ्यांनी पाठबळ दिले. विशेष म्हणजे यापूव झालेल्या पोलीस भरतीत काही गुणानी तिची संधी हुकली होती.
मात्र नुकत्याच झालेल्या कारागृह पोलीस परीक्षेत तिने यश मिळवत पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न साकारले. तिच्या निवडीबद्दल नामगाव ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.